Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक एड्स दिनानिमीत्त विविध कार्यक्रम



वाशिम, 
 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनानिमीत्त्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील रेड रिबन क्लबच्या माध्यमातुन ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन व बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.एचआयव्ही /एड्सबाबत जनजागृती ,मातेकडुन बालकांना होणारा एचआय.व्ही/एड्स संसर्गापासुन प्रतिबंध ,स्वत:चे एचआयव्ही स्टेटस जाणुन घ्या या तिनही विषयांवर ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सोशल मिडीयावर एका मिनीटांचा प्रचारात्मक व्हीडीओ स्पर्धा,जीआयएफ /मीमस स्पर्धा ,सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा , मास्क डिझाईन स्पर्धा तसेच आयईसी स्टॉल प्रदर्शनाचे उद्घाटनसुध्दा जिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे. 
   शहरातील विविध गर्दीच्या ठिकाणी स्टॉलच्या माध्यमातुन मोठया प्रमाणात जगजागृती करण्यात येणार आहे. 1 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये,अतिजोखीम गट, स्थानिक प्रवासी, वाहन चालक, घरेलु महिला व पुरुष कामगार यांचेकरीता संवेदीकरण कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 


     तरी जास्तीत जास्त महाविद्यालये, सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आपल्या स्तरावरुन जागतिक एड्स दिनाचे औचीत्य साधुन समाजाला या आजाराविषयी सजग करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.धर्मपाल खेळकर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments