Ticker

6/recent/ticker-posts

प्रा.डॉ.डी. एम. ललवाणी महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित



भुसावळ— येथील श्रीमती प. क.कोटेचा महीला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.डि.एम. ललवाणी यांना अखिल भारतीय पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र मुंबई या ख्यातनाम संघटनेतर्फे चिंतामणी लाॅन्स, मालेगाव येथे झालेल्या संघाच्या पाचव्या वर्धापन दिन व पत्रकार संमेलनानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात कृषिमंत्री मा. दादा भुसे, १२ वी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेतील कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी, पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी माधवजी थैल, सचिव विनोद पवार,
महिला अध्यक्षा श्रीमती सुनिता तोमर, प्रमुख सल्लागार सुभाषजी बिंदवाल यांच्या हस्ते त्यांना


 सन्मानपत्र  व सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. विनोदजी पवार व सुभाषजी बींदवाल यांनी प्रा. ललवाणी यांनी केलेल्या सामाजिक ,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक व अन्य सेवाकार्याचा याठिकाणी परामर्श घेतला .कार्यक्रमास उपस्थित असलेल्या असंख्य सरकार्‍यांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.  त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल असंख्य प्रेमींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, सोशल मिडीयाद्वारे त्यांचे अभिनंदनझ करण्यात आले .त्यांनी आपल्या  मनोगतातून  परमेश्वर, स्व.आई तारादेवी,  स्व. सुपुत्र स्वप्निल,
स्व.मोतीभाऊ कोटेचा,


परिवार व माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रांना हा माझा पुरस्कार अर्पण करीत असल्याचे नम्रपणे नमुद केले.

Post a Comment

0 Comments