मंगरूळपीर ◆
यंग सिटीजन टीम सातत्याने सहा वर्षापासून समाजासाठी समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे. यावर्षी यंग सिटीजन टीम अंतर्गत वी फॉर वी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत यंग सिटीजन टीम कडून तरुणांना आणि नागरिकांना प्रबोधन व्हावे यासाठी विविध विषयांवर प्रतिष्ठित मान्यवरांच्या भाषणाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री रक्षित जी देसाई आणि सौ नेहा देसाई यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमामध्ये तरुण कसा असावा, मतदान आणि नागरी हक्क, पर्यावरण आणि मनुष्य
त्याचबरोबर आरोग्य सुदृढ कसं राहावं अशा विषयावर तरुणांचे आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. यामध्ये तरुण कसा असावा या विषयावर श्री निलेश तुळजापूर, मतदान आणि नागरी हक्क या विषयावर श्री सुनील मालपाणी, पर्यावरण आणि मनुष्य या विषयावर श्री सचिन कुलकर्णी आणि आरोग्य सुदृढ कसे राहावे यासाठी प्राणिक
हीलिंग या प्रक्रियेची माहिती वी फॉर वी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री रक्षित जी देसाई आणि सौ नेहा जी देसाई यांनी दिली. आपले आरोग्य आपल्याला सुदृढ ठेवायचे असेल तर यासाठी रक्षित जी देसाई आणि नेहा जी देसाई यांनी प्राणिक हीलिंग ह्या
प्रक्रियेअंतर्गत आपण आपले आरोग्य कशा पद्धतीने सुदृढ ठेवू शकतो यासंदर्भात त्यांनी काही प्रात्यक्षिक करून दाखवले आणि आरोग्य सुदृढ राहण्याचा एक चांगला मंत्र त्यांनी नागरिकांना आणि तरुणांना दिला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रक्षित जी देसाई आणि नेहाजी देसाई यांनी आपले आरोग्य सुदृढ असेल तरच आपण समाजासाठी चांगले समाजोपयोगी कामे करू शकतो असे मत मांडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट प्रकाश इंगोले यांनी अध्यक्ष भाषण करून यंग सिटीजन टीमच्या कार्याचा सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून एडवोकेट रामनिवास बंग, नरेंद्र बजाज, सचिन कुलकर्णी, निलेश तुळजापूरे, सुनील मालपाणी, सौ.कविता मालपाणी सतीश हिवरकर, वेदांत नावंदर, संजय मिसाळ उपस्थित होते. यंग
सिटीजन टीमच्या 'वी फॉर वी या कार्यक्रमांतर्गत समाजासाठी कार्य करणाऱ्या काही समाजसेवकांचा आणि त्याचबरोबर काही सामाजिक संघटनांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तींमध्ये सुधाकर चौधरी, यश इंगोले, श्रेयास वार्डेकर करण मुंद्रे, पुरुषोत्तम शर्मा, समर्जीत रघुवंशी, रश्मी इंगोले, मनीष ठाकरे, अक्षय ठाकरे,
लायन्स क्लब, पाथ फाउंडेशन, राजस्थानी महिला मंडळ, विश्व हिंदू परिषद, सारथी फाउंडेशन, प्रयास फाउंडेशन, इमर्जन्सी ब्लड ग्रुप या समाजसेवकांचा आणि
सामाजिक संघटनांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी इन्सिडेंट टीमचे सुचित देशमुख अतुल खोपडे मयुर पाटील आकाश
चौधरी करण मुंद्रे पुरुषोत्तम शर्मा समर्जीत रघुवंशी वैष्णवी इंगोले रक्षा शर्मा आरती चव्हाण शीतल अग्रवाल पल्लवी पाटील गुंजन मुंदडा कल्याणी पाटील मीनल बाहेती यांनी विशेष सहकार्य केले














0 Comments