Ticker

6/recent/ticker-posts

लस न घेतलेल्या 10 जणांकडून 12500 रु. दंड वसूल



वाशिम दि.7  
जिल्ह्यात आज 7 डिसेंबर रोजी लस न घेतलेल्या खाजगी आस्थापनांच्या 10 व्यक्तींना 12500 रुपये दंड आकारण्यात आला.सर्व आस्थापना ह्या शहरी भागातील आहे
     कोविड लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत एकही लसीचा डोस घेतला नाही, त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे.दंडात्मक करावाईमुळे लस न घेता बिनधास्तपणे फिरणाऱ्या व्यक्तींना आळा बसण्यास मदत होत आहे.
          वाशिम शहरात लसीकरण न करता खासगी आस्थापनांमध्ये प्रवेश करणाऱ्या 6 व्यक्तींना तहसीलदार यांनी 10,500 रुपये दंड आकारला तर तहसीलदार मंगरुळपीर यांनी शहरातील चार आस्थापनांना 2 हजार रुपये दंड आकारला.

Post a Comment

0 Comments