Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात करिअर संसदेची स्थापना



मंगरूळपीर, प्रतिनिधी : श्री मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरूळपीर येथे करिअर कट्टा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी करिअर संसदेची स्थापना करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, संघटन कौशल्य आणि जबाबदारीची भावना विकसित व्हावी तसेच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळून योग्य वेळी योग्य संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने करिअर संसदेची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला असून करिअर कट्ट्याचे समन्वयक प्रा. डॉ. अनंत शिंदे व प्रा. डॉ. मनोज कडू यांनी संसदेची रचना केली.

करिअर संसदेमध्ये मुख्यमंत्री म्हणून कु. अनुश्री नंदकिशोर मुळे, नियोजन मंत्री म्हणून कु. चंचल रघुनाथ ठणठणकर, कायदा व शिस्तपालन मंत्री म्हणून सोहम सुनील सपकाळ, सामान्य प्रशासन मंत्री म्हणून दिगंबर संतोष मुंजे, माहिती व प्रसारण मंत्री म्हणून कु. भूमिका ओमकारराव म्हातारमारे, उद्योजकता विकास मंत्री म्हणून कु. तेजस्विनी श्रीधर चिपडे, रोजगार व स्वयंरोजगार मंत्री म्हणून गोपाल विनोद पुरी, कौशल्य विकास मंत्री म्हणून अर्जुन सुरेश खडसे, संसदीय कार्यमंत्री म्हणून कु. तेजस्विनी गजानन भालेराव, महिला व बालकल्याण मंत्री म्हणून कु. श्रुती किशोर पंडित यांची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून कु. महेक फातिमा युनूस खान यांचा समावेश करण्यात आला.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. करिअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, संवादकौशल्य आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments