Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी इरफान शेख यांची नियुक्ती

------------------------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष रावजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष फारुख अली. व चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते शेखइरफान शेखहुसेन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंगरुळपीरच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती पत्र देण्यात आले. शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांचे फुलांचा हार घालून स्वागत केले. तर त्यांनी आपले मत व्यक्त केले पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडणार असल्याचे शेख इरफान यावेळी म्हणाले. त्यांच्या निवडीने त्यांच्या फार मोठ्या चाहत्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचे निवडी बदल वॉटसअप, फेसबूक, फोन, प्रत्यक्ष भेटून अप्रत्यक्ष पणे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभाव व मदतीला धावून जाण्याची समाजसेवा खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची दखल हेर्न राष्ट्रवादीने त्यांचेवर जबाबदारी सोपवली अशी चर्चा ऐकवायास मिळत असुन ते भावी नगरसेवक पदासाठी धडपडत असल्याचे मतही स्थानिकांनी व्यक्त केले. त्यांना पूढील कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments