- सुप्रिया मनवर रायगड प्रतिनिधी
रायगड तालुक्यातील पाली येथील एका शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शाळेतील जेष्ठ शिक्षकाने पेपर चालू असतानाच विनयभंग केला.
याआधी देखील या शिक्षकाने पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मंगळवारी (30 नोव्हेंबर) सायंकाळी या शिक्षकावर पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
याबाबत सविस्तर माहिती अशी की, या विद्यार्थीनीचा गणित विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी या ज्येष्ठ शिक्षकाने तिचा विनयभंग केला. याआधी देखील त्याने असा प्रकार केला असल्याची तक्रार आहे. या प्रकरणानंतर पीडितेच्या संतापलेल्या नातेवाईकांनी या शिक्षकाविरोधात पाली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलीये.
त्यानुसार, पाली पोलीस स्टेशनमध्ये कलम 354 (अ)(1) सह लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 9 (एफ)(एम), 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे या करीत आहेत.

0 Comments