Ticker

6/recent/ticker-posts

वाशीम जिल्ह्याच्या विविध समस्या असल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची अश्विनीताई यांनी घेतली भेट


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करताना अश्विनीताई अवताडे 


 19 -12-2021 रोजी राळेगण सिद्धी येथे पद्मभूषण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील  सामाजिक कार्यकर्त्या आश्विनी राम औताडे   यांनी भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. या मध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरण या विषयावर चर्चा करताना अण्णांनी निष्काम सेवा करा महिला नां संघटित करून महिलांच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात तुमच्या कामातुन त्यांचा अधिकार व कायद्याविषयी जनजागृती  करा असा सल्ला दिला.


 ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अश्विनी ताई यांना देत पुढील कार्यास निस्वार्थ भावनेने सुरुवात करा सत्य परेशान हो सकता है पराजित नाही असे अण्णांचे बोल ऐकून. अण्णांच्या कार्यामुळे प्रेरीत होऊन व अण्णांनी जो माझ्या वर विश्र्वास दाखवला आणि जे मार्गदर्शन केले त्यामुळे आणखी जोमाने व उत्साहा ने जिल्ह्यात तालुक्यात कामाला सुरुवात करणार आहे असे यावेळी सांगितले. सगळ्या स्तरातील महिलांना सोबत घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याच काम आश्विनी ताई वाशिम जिल्हा मध्ये करत आहेत. अण्णांनी  या वेळी त्यांच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या अण्णांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा  अश्विनीताई वाशिम जिल्हा कडे रवाना झाल्या महिलांच्या न्याय हक्काच्या समस्या साठी कधीच मागे सरणार नाही असे आमच्या  प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या

Post a Comment

0 Comments