Ticker

6/recent/ticker-posts

ग्राहकांनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आत्मसा करावे , मंगरुळपिर तहसीलदार नरसय्या कोंडगुर्ले


 ग्राहक माहिती पुस्तकाचे उद्घाटन करताना मान्यवर

 मंगरूळपीर दि.24 धावपळीच्या जीवनात बदलता काळ लक्षात घेता ग्राहकांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात  करून आपले प्रश्न अभ्यासपूर्ण मांडून न्याय मिळवून द्यावा.असे प्रतिपादन तहसीलदार नरसय्या कोंडगुर्ले  यांनी केले.

डॉक्टर संजय राऊत विचार व्यक्त करताना

         मंगरूळपीर तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज 24 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली 

प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई. मार्गदर्शन करताना
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक . 
प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई. कार्यक्रमाचे अध्यक्ष नरसय्या कोंडगुर्ले , तहसीलदार मंगरुळपिर, डॉक्टर संजय राऊत , नितीन बंग ,चितलांगे इंडियन गॅस चे संचालक पुरुषोत्तम भाऊ चितलांगे ,दयासागर चे संपादक रविभाऊ इंगळे, पत्रकार फुलचंद भगत , वाशिम खबर आवाज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी, निवासी नायब तहसीलदार रवि राठोड ,कु रूपालीताई सोळंके  निरीक्षक अधिकारी मंगरूळपीर, सामाजिक कार्यकर्त्या वनमालाताई पेंढारकर
यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 
        तहसीलदार  कोंडगुर्ले म्हणाले, ग्राहक म्हणून आपलेही काही कर्तव्य असायला पाहिजे.आपण आपले प्रश्न लोकशाही मार्गाने व अभ्यासपूर्ण मांडले असता त्याची सोडवणूक निश्चितच होते. येत्या जानेवारी महिन्यामध्ये मंगरूळपीर तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची व ग्राहक पंचायतच्या सदस्यांची एक समन्वय सभा आयोजित करून ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


कु रूपालीताई सोळंके  निरीक्षक अधिकारी मंगरूळपीर मार्गदर्शन करताना

            यावेळी प्रा.सुधीर घोडचर अशासकिय सदस्य, महाराष्ट्र, राज्य ग्राहक परिषद मुंबई. यांनी वेगवेगळे कायदे व ग्राहकांनी आपल्या बाजू कशा पद्धतीने मांडाव्या या सर्व गोष्टींचा दृष्टांता सह उलगडा करून उपस्थितांना समजेल अशा शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले कुठल्याही ग्राहकाला अडचण आल्यास त्यांनी संपर्क साधावा असे आव्हान याप्रसंगी  यांनी केले. 




या कार्यक्रमासाठी स्वस्त धान्य दुकानदार ,पेट्रोल पंप संचालक ,शहरातील व्यापारी, ई-सेवा केंद्राचे प्रतिनिधी, शहरातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन अन्नपुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक कु सीमा दोनदल यांनी तर आभार प्रदर्शन रास्त भाव दुकानदार निलेश पाटील यांनी केले

Post a Comment

0 Comments