माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १२ वीचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. या वेळापत्रकानुसार परीक्षा घेत असताना शाळा, महाविद्यालये तसेच विद्यार्थ्यांसमोर येणाऱ्या अडचणींचा मंडळाने विचार करणे आवश्यक आहे. तो केला नसल्याने जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्याची मागणी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड व राज्य मंडळाकडे कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेने निवेदनाद्वारे केली आहे.
भूगोल परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के व सचिव प्रा. युवराज खुळे यांनी ही माहिती दिली. निवेदनात म्हंटले,की १२ वी साठी भूगोल हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांना शिकविला जात असून हा विषय घेणाऱ्या परीक्षार्थीची संख्या जास्त आहे. मागील १८ वर्षांपासून हा पेपर सकाळ सत्रात घेतला जात होता. परंतु यंदा तो अचानक दुपारच्या सत्रात घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
ALSO READ
जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त
जालन्यात रोपांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून खुलेआम गांजाची तस्करी, पोलिसांकडून १२ पोती जप्त
गटार दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत
गटार दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांची आर्थिक मदत
हजारो दिव्यांनी कृष्णा घाट उजळला
‘ओमायक्रॉन’ बाधित रुग्ण श्रीरामपूरमध्ये आढळला
आता सोया पेंडीवर साठवणुकीच्या मर्यादांचा आदेश
पेपरचा क्रम निश्चित करताना विषयाची विद्यार्थी संख्या विचारात घेतली जात नाही. भूगोल विषयाचा पेपर उशिरा घेण्यात येत आहे. त्यामुळे विज्ञान विषयाचे विद्यार्थी एका पेपरसाठी अडकून पडणार आहेत. यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सकाळ-दुपार अशी पेपरची वेळ निश्चित करताना त्या विषयातील परीक्षार्थीची संख्या विचारात घ्यावी. जास्त विद्यार्थी संख्या असणारे पेपर सकाळी व कमी विद्यार्थी संख्या असणारे पेपर दुपारी ठेवावेत, जेणेकरून कमी विद्यार्थ्यांची व कमी केंद्राची गैरसोय होईल.
आज अनेक परीक्षा केंद्र हे ग्रामीण व दुर्गम भागात असून सायंकाळी ६.३० नंतर पेपर जमा करणे, दिव्यांग असल्यास त्यासाठी ७ वाजतात. नंतर खाजगी वाहनाने तालुक्याच्या ठिकाणी जमा करणे, यासाठी बराच वेळ जातो. त्यानंतर तेथे परिरक्षकाकडून पॅकिंग करून पार्सल तयार करणे, या सर्व कामासाठी रात्र होते. याचा विचार व्हावा. कोविडचे कारण देत मंडळाने अर्धा तास वाढीव वेळ दिला आहे. परंतु परीक्षेस अजून दोन महिने बाकी असून त्यामध्ये सराव होणार आहे. वाढीव वेळ व एकूणच वेळापत्रक यामुळे विद्यार्थी व परीक्षा यंत्रणेवर ताण येणार आहे. त्यामुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी भूगोल परिषदेकडून सर्व विभागीय मंडळांकडेही करण्यात आली आहे.
0 Comments