मृदा, जलव्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर रासेयो साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
प्रतिनिधी:-
सचिन राणे, शेलुबाजार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा येथे २४ डिसेंबर शुक्रवारला मृदा व जलव्यवस्थापन तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयावर रासेयो च्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला वाशिम चे निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे प्रमुख मा. श्री. शैलेशजी हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाऊंडेशन चे विभागीय समन्वयक मा. श्री. सुभाष नानवटे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळपीरचे नायब तहसिलदार मा. श्री. दिलीप चौधरी व पाणी फाऊंडेशन चे तालुका समन्वयक मा. श्री. सुभाष गवई हे उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे यांनी महाविद्यालय विविध क्षेत्रात करित असलेल्या कार्याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापना बचाव पथकाच्या माध्यमातून महाविद्यालय वाशिम जिल्ह्यात करीत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी उपस्थितांना सांगितले. पुढे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले पाणी फाऊंडेशन चे विभागीय समन्वयक मा. श्री. सुभाष नानवटे सर यांनी महाविद्यालय विविध क्षेत्रात करित असलेल्या कार्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे व विद्यार्थांचे कौतुक केले. पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून पाण्या संदर्भात त्यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. वेळीच पाण्याचे नियोजन करून ते जमिनीत मुरविले नाही तर येणारा काळ हा भीषण असेल. जल व्यवस्थापना सोबतच मृदा संधारण देखील किती महत्वाचे आहे हे त्यांची पटवून दिले. श्रमदानाच्या माध्यमातून आज कित्येक तरी गावांचा कायापालट झाला आहे. पाणी फाऊंडेशन च्या माध्यमातून कित्येक तरी गावं समृद्ध झालीत व काही त्या दिशेने वाटचाल करीत आहेत. व्हिडीयो च्या माध्यमातुन शाश्वत व सेंद्रिय शेती, जंगलाचे संवर्धन यासोबतच भरपूर विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर मंगरूळपीर चे नायब तहसिलदार मा. श्री. चौधरी सर यांनी देखील जलसंधारण बद्दल अमुल्य असे मविद्यार्थ्यांनी तसेच पाणी फाऊंडेशन चे तालुका समन्वयक मा. श्री. सुभाष गवई यांनी देखील पाणी फाऊंडेशन तालुक्यात कशाप्रकारे काम करत आहेत. त्यात विद्यार्थ्यांची काय भुमिका असावी याबद्दल मार्गदर्शन केले.
यानंतर वाशिम जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. शैलेशजी हिंगे मार्गदर्शन करताना म्हणाले कि, युवकांनी सामाजिक कार्यांच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करावी. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची आवडीसोबत व्यवसायाभिमुखसुध्दा असावे,जेणेकरून त्यांना रोजगाराची चिंता राहणार नाही. असे ते म्हणाले. तसेच त्यांनी साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजाचे रासेयोचे आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक संकटाच्या काळात इतरांना करीत असलेल्या मदतीबद्दल त्यांनी पथकाची प्रशंसा केली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. एस. डोंगरे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी डाॅ. पाथ्रीकर मॅडम, आयक्युएसी समन्वयक प्रा. भगत मँडम, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. लहासे सर प्रा. डाॅ. घोंगटे सर, प्रा. लेफ्टनंट डाॅ. बोरचाटे सर, प्रा. भगत सर, प्रा. डाॅ. कडू सर तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक वृंद तसेच कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments