मंगरूळनाथ :- "व्यापार हा देशाचा फार महत्त्वाचा घटक आहे उत्तम प्रकारचा व्यापार हा देशाच्या प्रगतीसाठी पूरक असतो.व्यापारामध्ये ग्राहक हा महत्त्वाचा केंद्रबिंदू असून, ग्राहक हित जपणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळामध्ये ग्राहकांची विविध प्रकारची होणारी फसवणूक ही फार मोठी समस्या असून ग्राहकांना न्याय मिळाला पाहिजे असे प्रतिपादन मंगरूपीरचे तहसीलदार मा.नरसय्या कोंडगुर्ले यांनी केले.
अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटन (नवी दिल्ली)वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने मंगरुळनाथ येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले "ग्राहकांवर होणाऱ्या विविध प्रकारचा अन्याय टाळण्यासाठी प्रशासन स्तरावर योग्य ते सहकार्य होत आहे व पुढे सुद्धा होत राहील.तसेच ग्राहकांशी संबंधित विविध अधिकाऱ्यांनी सुद्धा आपापल्या विभागात लक्ष घालून ग्राहकांची व जनतेची फसवणूक होणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाला लाभलेल्या उद्घाटक सौ.वनमालाताई पेंढारकर (महाराष्ट्र प्रदेश सचिव)AICPU यांनी ग्राहक चळवळ काल, आज आणि उद्या या विषयावर आपले महत्वपूर्ण असे विचार मांडले.
प्रा.सुनिल सपकाळ (वाशीम जिल्हाध्यक्ष) AICPU यांनी आपल्या प्रास्ताविकातून संघटनेची कार्यपद्धती, उद्देश,संघटनेचे कार्य सर्वांसमोर ठेवले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुधीर घोडचर (महाराष्ट्र राज्य ग्राहक परिषद मुंबई अशासकीय सदस्य) त्याचप्रमाणे श्री राऊत साहेब (विदर्भ कार्यकारणी सदस्य)AICPU,प्रमोद पेंढारकर (विदर्भ कार्यकारणी सदस्य)AICPU, बजरंग पेंढारकर तालुका अध्यक्षAICPU, राजूभाऊ मनवर तालुका (अध्यक्ष),AICPU हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमोद पेंढारकर यांनी केले.


0 Comments