Ticker

6/recent/ticker-posts

मतदान व मतमोजणीच्या दिवशी जिल्हयातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद


वाशिम: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या 6 जागांसाठी व्दिवार्षिक निवडणूक 2021 चा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार सदर निवडणुकीचे मतदान शुक्रवार, 10 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणी मंगळवार 14 डिसेंबर 2021 रोजी होणार आहे.

या निवडणूकी दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई/ कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) अन्वये आणि महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची व्दिवार्षिक निवडणूक 2021 च्या कालावधीत संपुर्ण वाशिम जिल्हयात मतदानाची वेळ संपण्यापूर्वी 48 तास अगोदरपासून 8 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 4 वाजेपासून ते 10 डिसेंबर 2021 रोजीचे सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी 14 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी संपेपर्यंत जिल्हयातील सर्व मद्यविक्री,अनुज्ञप्तीधारकांनी या कालावधीत व वेळेत मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवाव्यात.सदर आदेशांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांचे नावे असलेली अनुज्ञप्ती मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 54 वा 56 अन्वये तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments