Ticker

6/recent/ticker-posts

चोरी घरफोडी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जीएसएम सिक्‍युरिटी सिस्टिमचा वापर करा . यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगरुळपीर



मंगरुळपीर पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर घर ,दुकान ,ऑफिस, गोडाऊन, बाईक, फोर व्हीलर ,आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर आपल्या प्रतिष्ठानमध्ये करावा. याकरिता पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये  कार्यशाळेचे आज रोजी आयोजन केले होते


जीएसएम टेक्नॉलॉजीचा भारतातील कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल द्वारे ऑपरेट करता येते .आपण कामानिमित्त बाहेरगावी असाल तरी डिवाइस बसवलेले ठिकाणी चोरीच्या घटनेची माहिती तुमचे कडील असणाऱ्या 5 मोबाईल नंबर वर मिळते . त्यामुळे तुमच्या मालमत्तेचे बचाव तुम्ही करू शकता अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांनी दिली यावेळी ठाणेदार धनंजय जगदाळे एपीआय  तुषार जाधव, विनोद डेरे पोलीस मित्र , विवेक नाकाडे  शिवसेना नेते , रवि कांबळे व उदेभान लांडगे संचालक साईकृपा सिक्युरीटी सिस्टीम वाशिम मंचावर उपस्थित होते . तसेच कार्यशाळेला शहरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती होती .


Post a Comment

0 Comments