ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे, काही राज्यांत शाळा सुरू झाल्या आहेत. अशातच कर्नाटकमध्ये एका शाळेत ९४ विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
देशात करोनाचा नवीन वेरियंट ओमिक्रॉनची एन्ट्री झालीय. काही दिवसांतच ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली आहे. अशातच आता धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेतील तब्बल ९४ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे प्रशासन हादरले आहे.
कर्नाटकमधील नरसिंहराजपुरू तालुक्यातील केंद्र सरकारच्या एका शाळेत तब्बल ९४ विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. विशेष म्हणजे कर्नाटकमध्येच ओमिक्रॉनचे देशातील पहिले दोन रुग्ण आढळून आले होते. यामुळे प्रशासन हादरले आहे. फक्त विद्यार्थीच नव्हे तर ३ शालेय कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे करोना संसर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या आता १३ वर गेली आहे.
डॉक्टरांच्या एका टीमकडून सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये कुठलीही लक्षणे आढळली नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरवातीला शाळेतील ३ विद्यार्थी आणि ४ कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यानंतर आरोग्य विभागाने तातडीने पावलं उचलत सर्व ४१८ विद्यार्थ्यांचे करोना चाचणीसाठी नमुने घेतले. तसंच शालेय कर्मचाऱ्यांचेही नमुने घेऊन ते चाचणीसाठी पाठवण्यात आले.

चाचणीत एकूण ९४ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. तसंच ३ शालेय कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
तेलंगणमध्ये मेडिकलचे ४३ विद्यार्थी पॉझिटिव्ह
तेलंगणमधील करीमनगर जिल्ह्यातील बुमक्कल येथील चलमेडा आनंदराव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे विद्यार्थी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण ४३ विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती करीमनगर जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

0 Comments