चिपळूण / वार्ताहर बीड
पुणे इंदापूर येथील बोगस फवारणी प्रमाणपत्रधारकांची चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र
आपण बीड जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्रधारकांचा पर्दापाश केल्यानंतर आरोग्य विभागाने बीड मधे चौकशी चालू केली आहे माञ पुणे जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्रधारकांची चौकशी अद्याप सूरू झालेली नाही याबाबत वारवांर पञव्यवहार करून देखील दखल घेतली गेली नाही. त्यामुळे 30 नोव्हेंबर 2021 रोजी संघटनेच्या आठ पदाधिका-यांनी सहसंचालक पुणे कार्यालयासमोर आत्मदहनाचा निर्णय घेतला होता. माञ यावेळी संघटनेच्या मागण्या बाबत सकारात्मक चर्चा झाल्याने आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता मागे घेण्यात आला आहे.यावेळी संघटनेकडून आठ लोकांची नावासहीत तक्रार करून चौकशी करावी अशी मागणी केलीआहे. 2005 नंतर फवारणी कर्मचारी घेणे बंद केले असताना पुणे जिल्हा हिवताप कार्यालयामधे 2005 नंतर मोठया प्रमाणात फवारणी कर्मचारी भरती करण्यात आली यामधे एकट्या इंदापूर तालुक्यातील मोठया प्रमाणात फवारणी कर्मचारी भरती करण्यात आली असून हे सर्व संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आरोग्य हिवताप हंगामी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष ईकबाल चौघुले व राज्य संघटक संघटक विजय राउत यांनी आरोग्य सहसंचालक पुणे यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.


0 Comments