Ticker

6/recent/ticker-posts

लोकोपयोगी कार्य करणार्‍या नवि मुंबईचे संजुभाऊ वाडे यांच्या वाढदिवसानीमित्य मंगरूळपीर येथे कॊरोना योध्दाचा सत्कार




  मंगरूळपीर

 संत तुकाराम महाराजांनी  लिहिलेले अभंग आठवले  
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा सातासमुद्रापलीकडे
सेवाभावी कार्यातुन राजकारण साधनार्‍या तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहुन लोकोपयोगी काम करणार्‍या नवी मुंबई शिवसेनेचे लोकप्रिय आमदार संजुभाऊ आधार वाडे यांच्या वाढदिवसानिमित्य त्यांच्या अर्धांगिनी व त्यांचे हस्ते मंगरुळपीर येथील कोरोणाकाळात ऊल्लेखनिय कार्य करणार्‍या कोरोना योध्दांचा सत्कार

25 वर्षांपासून रुग्णालयात दाईची कामगिरी बजावणाऱ्या
निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या खऱ्या कोरोना युद्धाचा सत्कार

आणि विविध समाजपयोगी ऊपक्रम राबवुन वाढदिवस साजरा करण्यात आला मंगरूळपिर येथील ग्रामीण रुग्णालयात कॊरोना काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कॊरोना योध्दाचा सत्कार दि 25 रोजी मुंबई येथील सामाजिक विचारवंत तथा नगरसेवक संजय वाडे यांच्या हस्ते स्वेटर व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.



या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिक्षक चव्हाण, तर प्रमुख पाहुणे म्हणून ,शेतकरी नेते गजानन अमदाबादकर,डॉ नरेंद्र कोठाळे,सुरेखाताई वाडे,आदी मान्यवर उपस्थित होते.



यावेळी शेतकरी नेते अमदाबादकर म्हणाले, संजय वाडे यांनी सामाजीक बांधिलकी जोपासणाऱ्या व कॊरोना काळात जीव धोक्यात घालून काम केले अशा व्यक्तीचा सन्मान करणे ही एक कौतुकास्पद बाब असून भविष्यात असे उपक्रम प्रत्येकाने राबविणे गरजेचे आहे 







तसेच यावेळी डॉ कोठाले म्हणाले, मंगरूळपिर तालुक्यातील विध्यार्थ्यांना भविष्यात IAS करण्यासाठी अद्यावत अभ्यासीका केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे अभ्यासकेन्द्र विध्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे 











या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय बाब अशी की गेली 25 वर्षांपासून रुग्णालयात दाईची कामगिरी बजावणाऱ्या कुसूमताई झाडे या महिलेचा भावपूर्ण सत्कार करून मान्यवरांनी प्रसंशा केली कार्यक्रमाचे संचलन डॉ अजमल यांनी केले तर आभार प्रकाश संगत यांनी मानले या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.यावेळी विविध गरजुंना जिवनपयोगी साहित्यही वितरीत करुन वाढदिवस साजरा केला.यावेळी नगरसेवक संजुभाऊ आधार वाडे यांचे स्नेही मिञमंडळीसह विविध क्षेञातील मान्यवर,राजकिय व्यक्तीमत्व तसेच पञकारांची ऊपस्थीती होती.
















 चांगल्या कार्याचे कौतुक करणे यालाच खरा सन्मान म्हणतात हेच साध्य यानिमित्ताने संजय भाऊ वाडे यांनी कोसो दूर येऊन समाजाला आपल्या प्रती करून त्यांचे ऋण फेडण्याचा कार्य या माध्यमातून करत आहेत


Post a Comment

0 Comments