Ticker

6/recent/ticker-posts

माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांची सदिच्छा भेट , मा युसुफसेठ पुंजानी एक सामाजिक सेवाभावी नेतृत्व कारंजाचे भावी आमदार

                                            

राजकीय वर्तुळातील मोठ्या हालचाली कारंजा कडे सुरू. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री राजकीय वर्तुळातील धुरंदर नेते  गुलाबरावजी गावंडे.यांनी दिनांक.२६ डिसेंबर रोजी कारंजा शहरातील स्थानीय पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस नेते हाजी मो युसुफसेठ पुंजानी  यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी युसुफसेठ पुंजानी यांनी माजी राज्यमंत्री गुलाबरावजी गावंडे यांचा  मोठ्या आदरसत्‍काराने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी स्थानिक विकास कार्यक्रमासह  विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. या भेटीवरून आता स्पष्ट होत आहे कारंजाचे भावी आमदार
मा युसुफसेठ पुंजानी एक सामाजिक सेवाभावी नेतृत्व यशाचा रस्ता खडतर पण यशस्वी निश्चित होणार कारंजा ते बारामती पर्यंत याबाबत सखोल चर्चा होत असल्याचेही या भेटीवरून दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच अजितदादां पवार यांनी युसुफसेठ  पुंजानी यांचा बारामतीत सुद्धा सत्कार केला होता . कारंजाचे व मानोराचे भावी आमदार युसुफसेठ  पुंजानी. निश्चित असल्याचेही गल्ली ते दिल्ली पर्यंत राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भल्याभल्यांची बत्ती गुल यावेळी निश्चितच होणार सामाजिक बांधिलकी व गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जोपासणारा संपूर्ण देश हादरला असलेल्या कोरोना सारख्या महामारीत काळात वाशिम जिल्ह्यातील गोरगरिबांच्या घरात चूल पेटवणारा व दोन टाइमचे जेवण मिळेल अशी व्यवस्था करणारा म्हणजे युसुफसेठ  पुंजानी. यांच्या भेटीसाठी यावेळी राजेंद्र पाटील घुले,दिवाकर पाटील कडू,उत्कर्ष राऊळ,दिलीप सावजी,दत्तात्रय परकोटे नगरसेवक जाकीर शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments