वशिम जिल्हयात क्युआर कोड व जिपीएस प्रणाली "दृष्टी" चे कामाकाज गेली दिइ महीन्यापासुन सुरु असुन ते आज रोजी दृष्टी" या नावाने कार्यान्वयीत करण्यात आली आहे. यापुढे वाशिम जिल्हयामध्ये क्युआर कोड ची संख्या अजुन वाढविण्यात येईल तसेच जिल्हा नियोजन मंडळाकडुन मंजुरी मिळालेले ९ चारचाकी वाहने व १५ दुचाकी वाहने या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
सर्व समावेशक पोलीस गस्त प्रणाली मध्ये एकूण ३५ वोट मार्शल व ७७ पेट्रोलींग मोबाईल चा समावेश आहे. सदर प्रणालीची यशस्वीता बिट मार्शल आणी पेटोलॉग मोबाईल च्या प्रभावी गस्तीवर अवलंबून आहे. यापुढेही नवीन योजना राबविण्यात येणार आहेत.
सदर प्रणाली मा. बच्चन सिंह पोलीस अधिक्षक वाशिम यांचे मार्गदर्शनात श्री गोरख भामरे अपर पोलीस अधिक्षक वाशिम, श्री. सोमनाथ जाधव पोलीस उप अधिक्षक तथा पोलीस निरिक्षक स्थानिक गुन्हे शाखा वाशिम, सपोनि प्रमोद इंगळे पोउपनि संतोष जंजाळ यांनी कार्यान्वीत केली आहे.
कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे वाशीम जिल्ह्यात चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आहे या जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात यश आल्याचे शक्यता नाकारता येणार नाही गस्तीवर प्रत्येक भागातील कर्मचाऱ्याची व अडीअडचणींना सामना करण्याची सोया प्रणालीमुळे करण्यात आल्याचेही प्रशासनात बोलले जात आहे वाशिम जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने मानाचा मुजरा जय हिंद



0 Comments