Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्याने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम अंतर्गत विशेष मार्गदर्शन


मंगरुळपीर तालुक्यातील भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्याने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम मोटार वाहन चालक/मालक यांच्या सोयीसाठी कोविड- 19 च्या नियमावलीचे पालन करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संजय पल्लेवाड,मोटार वाहन निरीक्षक अनिल कदम, यांनी मोलाचे मार्गदर्शन केले



मासिक शिबीर दौऱ्यात वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी, तपासणी, वाहन चालक यांना अमृत महोत्सवानिमित्त मंगरुळपीर येथे विश्रामगृहाच्या पटांगणात नागरिकांना पटेल अशा भाषेत मोटार वाहन निरीक्षक पल्लेवाड यांनी आपले विचार व्यक्त करताना मास्क लावणे, अंतर राखणे आणि वेळोवेळी सॅनिटाझरचा वापर करणे . दुचाकीवर फिरणाऱ्या नागरिकांना आपल्या कुटुंबाच्या सुरक्षितेसाठी नागरिकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असल्याचे पटवून दिले याचे फायदे ही सांगितले. हेल्मेट नसल्यास मोटार वाहन निरीक्षकांकडून संबंधित वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात 'रस्ता सुरक्षा अभियान' राबवले जात असताना, त्या पार्श्वभूमीवर आरटीओ प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने व होत असलेल्या अपघाताला आळा घालण्याच्या हेतूने हे निर्बंध केले आहे ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास (कलम 181) वाहन मालकास 3 महिने कैद, 1 हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.दारू पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास (कलम 185) पहिल्या अपराधाबद्दल 6 महिने कैद किंवा दंड 2 हजार रुपये किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित किंवा रद्द होते.कलम 185 :- मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 185 अन्वये रक्तातील मद्याकांची पातळी ( बल्ड अल्कोहोल कॉन्सेंट्रेशन ABC) ही 100 मिलीलिटर रक्तात 30 मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी रुपये 2 हजार दंड किंवा सहा महिने कैद अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसेच कलम 20 (2) अन्वये सदर चालकाचे लायन्सेस सहा महिने निलंबित होऊ शकते. तसेच पुन्हा त्याच व्यक्तीने सदर गुन्हा केल्यास 22 (2) कलमान्वये लायसेन्स कायमचे रद्द होते.वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार (कलम 207):- ड्रायव्हिंग लायसन्स, परवाना, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसताना चालविण्यात येणारी वाहने अटकावून ठेवण्याचा अधिकार आर.टी.ओ. तसेच पोलीस अधिकाऱ्यांना आहेत.अवैध प्रवासी वाहतूक (कलम 66/ 192 अ) :- विना परवाना चोरटी प्रवासी वाहतूक केल्यास अथवा आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केल्यास कलम 66/192-अ अन्वये न्यायालयीन कारवाई होऊन रुपये 5 हजार पर्यंत दंड होऊ शकतो. तसेच वाहनाचे रजिस्ट्रेशन 120 दिवसांपर्यंत निलंबित केले जाऊ शकते. अशा प्रवासी वाहतुकीस विम्याचे संरक्षण नसते.केंद्रीय मोटार वाहन नियम 138(3) सिटबेल्ट न वापरता वाहन चालविणे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम 250 (अ) वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करु नये यामुळे खूप मोठा अपघात होऊ शकतो .अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यु अथवा कायमचे अपंगत्व आल्यास :-मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 163 (1) अन्वये केंद्र सरकारने अध्यादेशाद्वारे ‘सोलॅशियम स्कीम’ (अनुकंपा योजना) तयार केली आहे. त्याद्वारे ज्या तालुक्यात अपघात झाला असेल त्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे सहा महिन्याच्या आत विहित नमुन्यात अर्ज केल्यास सरकारतर्फे मृत व्यक्तींच्या वारसदारास 25 हजार रुपये व गंभीर इजा होणाऱ्या व्यक्तीस 12 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळते.अनावश्यक हॉर्नचा वापर :-चालकाने गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्ज हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे. सायलेल्स झोनमध्ये (हॉस्पीटल, न्यायालये इत्यादी) हॉर्न वाजविणे गुन्हा आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्याने रस्ता सुरक्षा अभियान उपक्रम अंतर्गत मार्गदर्शन या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य मोहन पेडगे ,नितीन बुरे ,नितिन राऊत,सतोष पवार,कुशल कंकाळ,सचिन राठोड, अजमल भाई, राठोड सर, जीया भाई इत्यादी मान्यवरांसह नागरिकांची उपस्थिती होती


Post a Comment

0 Comments