मुंबई : एलपीजी ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२२ या वर्षाची सुरुवात कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खास असणार आहे. इंडियन ऑइल कंपनीने या ग्राहकांना नवीन वर्षाचं गिफ्ट देऊ केलं आहे. १ जानेवारी २०११ पासून कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किमती इंडियन ऑइलने १०० रुपयांनी कमी केल्या आहेत. या दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
याआधी डिसेंबर २०२१ मध्ये या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. डिसेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी कमर्शिअल गॅस वापरणाऱ्या ग्राहकांचा खिसा रिकामा झाला होता. मात्र, त्यावेळी देखील घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नव्हता. आता व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल मालकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्ली आणि मुंबईमध्ये नॉन सब्सिडीच्या १४.२किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर ८९९.५० रुपये आहे. तर कोलकात्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचे दर ९२६ रुपये, चेन्नईमध्ये ९१५.५० रुपये आहेत.
0 Comments