Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा नगर पालिका अंतर्गत 3 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन , मो.युसूफ पुंजानी सह पदाधिकारी



प्रतिनिधी । कारंजा (लाड)

कोरोना महामारी मूळे कारंजा नगर पालिकेतील अनेक काम मागील एक वर्षांपासून रखडलेले होते. अखेर या रखडलेल्या कामांना चालना मिळाली असून शहरातील 3 कोटीच्या कामाचा नववर्षाचा औचित्य साधून दि.१ व २ जानेवारीला राष्ट्रवादीचे नेते मो. युसूफ पुंजानी यांच्या हस्ते कारंजा नगर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले आहे.
उदघाटन करण्यात आलेल्या कामांमध्ये गवळीपूरा,नूरनगर, माळीपूरा, समतानगर, अस्ताना,भारतीपुरा, काझीपुरा, गौतमनगर या परिसरासह म.ब्र.आश्रम येथील वानखडे यांच्या घरापासून बासोळे यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता बनविणे, म.ब्र. आश्रम येथील नितीन चढार यांच्या घरापासून कस्तुरीवाले यांच्या घरापर्यंत डांबरी रस्ता बनविणे, लोकमान्य नगर येथील नागोबा-बोकोबा व विठ्ठल मंदिर परिसरातील पेवर ब्लॉक टाकणे,बालाजी मंदिर येथील शंकर गायकवाड ते दिलीप कोळस्कर यांच्या घरापर्यंत पेर ब्लॉक बसविणे, जयस्तंभ चौक येथील गणपती कलेक्शन पासून जगत जननी माँ भवानी मंदीर परीसर ते आसवा घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक बसविणे, दामिनी नगर श्रीकृष्ण मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे, सिंधी कॅम्प येथील खेमवाणी यांच्या घरापासून जेसवाणी यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम व पेव्हींग ब्लॉक टाकणे , बंजारा कॉलनी गुघाने, किशोर लाहे ते गजानन लाहे घर पेव्हर ब्लॉक बसविणे, सिंधी कॅम्प येथील धरमदास राघवाणी यांच्या घरापासून गोविंद नागवाणी यांच्या घरापर्यंत पेव्हींग ब्लॉक टाकणे, मंगरूळवेश येथील गुल्हाणे यांच्या घरापासून बारबोले यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करून काँक्रीट रस्ता बनविणे या सह एकूण 3 कोटी 15 लक्ष रुपयांच्या कामाचा उदघाटन करण्यात आला आहे या वेळी राष्ट्रवादी नेते मो.युसूफ पुंजानी, नगर नगर पालिकेचे उपाध्यक्ष जुम्मा पप्पूवाले, गटनेता फिरोज शेकूवाले, नगरसेवक एम.टी.खान, सलीम गारवे, चांद शाह ,अ.एजाज अ.मन्नान, जाकिर शेख, जावेद्दोदीन इस्लामोद्दीन शेख, इरफान खान, सलीम प्यारेवाले, राजु इंगोले, अ.रशीद, जाकिर अली, अ. आरीफ, शे. युनुस पहेलवान, इरशाद अली,सै. मुजाहीद, निसारखान,जुबेर बेग मिर्झा, उस्मान खान,भोजा पहेलवान,ऍड.मिलिंद खंडारे, विलास राऊत आदींची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments