वाशिम - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने अकोला येथे आयोजित एकांकीका स्पर्धेत येथील सिने अभिनेता अरविंद उचित यांना गणलक्ष्मी करंडक वसंतराव रामदेव राज्यस्तरीय पुरस्काराने तर अभिनेत्री हंसिनी उचित यांना शामकमल स्मृती राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याबद्दल रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने २५ डिसेंबर रोजी अकोला नाका परिसरातील रेखाताई कन्या शाळेत पुरस्कार्थींचा सत्कार सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, तर प्रमुख अतिथी म्हणून शेषराव मेश्राम, तुकाराम खडसे, प्रकाश गवई, अनंत कांबळे, हिरामण साबळे, माणिकराव जामणीक यांची उपस्थिती होती. यावेळी तेजराव वानखडे यांच्या हस्ते अरविंद उचित यांचा मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना तेजराव वानखडे म्हणाले की, अरविंद उचित यांना मिळालेला पुरस्कार हा वाशिम जिल्ह्यासाठी भूषणावह असून त्यांचे कला व नाट्यक्षेत्रातील कार्य अतिशय उल्लेखनिय असून गौरवास्पद आहे. उचित दाम्पत्यांनी अनेक मराठी सिनेमामध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. नाट्य व एकांकीका स्पर्धामध्ये त्यांनी भाग घेवून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सत्काराबद्दल उचित यांनी आयोजक व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला रामदास भगत, शाहीर लोडजी भगत, शाहीर दत्तराव वानखडे, उल्हास इंगोले, रवि भगत, दिलीप कांबळे, विश्वनाथ इंगोले, रामदास पंडीत, धनंजय कांबळे, सिध्दार्थ पाटील, राहूल मैंदकर, निलेश कंकाळ, संजय इंगोले पंचाळा, देवचंद खाडे, विजय खाडे, अमोल खाडे, पद्मानंद खाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments