प्रतिनिधी:-
सचिन राणे, शेलुबाजार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे आपत्ति व्यवस्थापन बचाव पथक हे गेल्या एक वर्षापासून आपत्ति च्या काळात, मग ते रस्ते अपघात असो कि पाण्यात बुडालेले मृतदेह बाहेर काढणे असो सर्पदंश असो किंवा आगीच्या घटना असो संकटात सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी हे महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पथक
ताबडतोब धावुन जाते. प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य हे पथक करित असते. रासेयो चे संचालक डाॅ. राजेश बुरंगे सर तसेच वाशिम जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मा. श्री. शैलेश हिंगे सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे सर ,महाविद्यालयाचे रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे समन्वयक प्रा. बी.एस. डोंगरे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाच्या सदस्यांनी अपघातातील अंदाजे ७० अपघाताग्रस्तांना वेळीच वैद्यकीय मदत मिळवुन देऊन त्यांचा जीव वाचविला. यासोबतच पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व धरणात तसेच तलावात बुडालेल्या ३ नागरिकांचे मृतदेह बाहेर काढून प्रशासनाला सहकार्य केले. सर्पदंश बाधीत ३० रूग्णांना वेळीच मदत देऊन त्यांचा पण जीव या युवकांनी वाचविला. जंगलाला लागलेली आग तसेच घराला लागलेली आग असो या वेळी वेळीच धावून जात आग विझविण्यासाठी स्वतः च्या जीवाची बाजी लावली. मधमाश्या च्या हल्ल्यात गंभीर झालेला युवक असेल किंवा आपत्ति व्यवस्थापनासाठी गावागावांमध्ये केलेली जनजागृती असो,या सोबतच मानवी वस्तीत निघालेल साप, चवताळलेले वन्यजीव,जखमी किंवा विहिरीत पडलेले वन्यजीव असो या सर्वांच्या मदतीसाठी हे युवक तत्काळ धावुन जातात.पर्यावरण संवर्धन,असेल कोव्हीड-१९ च्या काळात प्रशासनाला केलेले सहकार्य,लसीकरणासाठी, जनजागृती,यासोबतच पोलिस स मित्र म्हणून लाॅकडाऊन च्या काळात केलेली मदत ,हे सामाजिक कार्य रासेयो च्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या माध्यमातून महाविद्यालयाचे युवक कार्य करीत असतात. या कार्यात आता मुली देखील सरसावल्या असुन साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा च्या रासेयो च्या १० मुलींचे देखील एक पथक तयार केले. आहे. यामध्ये वैष्णवी राऊत, पुनम राऊत, दिक्षा भगत, वैष्णवी पाटील, मंजुषा इंगोले, सुकेशनी कांबळे, राधा राऊत, मोहिनी अंदुरकर, तृप्ती सिंकटवार, चैताली इंगोले या दहा मुली आता आपत्ती व्यवस्थापन साठी कार्य करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे सर यावेळी मुलींचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आयक्युएसी समन्वयक प्रा. जया भगत मँडम तसेच महिला कार्यक्रम अधिकारी डाॅ. ममता पाथ्रीकर मॅडम, प्रा.डोंगरे सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते.


0 Comments