Ticker

6/recent/ticker-posts

काटेपूर्णा अभयारण्यात रासेयो चा अभ्यास दौरा; प्लास्टिक निर्मुलन व पाणवठे स्वच्छतावनोजा येथिल साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाचा उपक्रम


प्रतिनिधी:- 
सचिन राणे, शेलुबाजार

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा च्या राष्ट्रीय सेवा योजनेकडुन स्वयंसेवकांना काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य येथे एक दिवसीय अभ्यास दौरा तसेच प्लास्टिक निर्मुलन व पाणवठे स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
रासेयोचे संचालक डाॅ. राजेश बुरंगे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे ,कार्यक्रम अधिकारी प्रा. बापुराव डोंगरे तसेच काटेपूर्णा अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पवन जाधव वनपाल श्री. खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 35 स्वयंसेविकांचा तसेच डाॅ. गजानन घोंगटे सर व प्रा. बापूराव डोंगरे यांचा सहभाग होता. रासेयो चा स्वंयसेवक आदित्य इंगोले व तृप्ती सिंकटवार यांनी विद्यार्थांना विविध पक्षी, निसर्ग, वन्यजीव याबद्दल विस्तृत अशी माहिती दिली. 

यावेळी स्वयंसेविकांनी काटेपूर्णा अभयारण्यातील नेचर ट्रेल च्या आजुबाजूला पडलेला प्लास्टिक कचरा उचलुन गोळा केला. त्याचसोबत अभयारण्यात बनविलेले पाणवठे देखील स्वच्छ केले. यावेळी विविध प्रकारचे पक्षी वन्यजीव तसेच दुर्मिळ झालेल्या अजगराचे देखील दर्शन झाले. निसर्ग परिचय केंद्र येथे सुध्दा विविध प्रकारच्या पक्षी, प्राणी, कोळी, रानफुल यांची माहिती यावेळी स्वयंसेविकांनी घेतली. आदित्य इंगोले व तृप्ती सिंकटवार यांनी मानवी जीवनात जंगलात असलेल महत्त्व यावेळी स्वयंसेविकांना पटवुन दिले. वनविभाग तसेच  साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments