Ticker

6/recent/ticker-posts

साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती संपन्न




प्रतिनिधी:-
 सचिन राणे, शेलुबाजार

दिनांक ०३ जानेवारी २०२२ क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले  व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त  १२ जानेवारी २०२२ पर्यन्त जागर जाणिवांचा ,विकास ग्रामीण महिला सक्षमतेचा, या उपक्रमा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली  करण्यात आले आहे.


आज  क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय श्रीमती कमलाबाई राऊत, (ज्ञान गंगा शिक्षण  प्रसारक संस्था ) यांच्या हस्ते व व्यसपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत सुरवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करन्यात आले. प्रास्ताविकातून डॉ. ममता पाथ्रीकर यांनी महिला सक्षमीकरण कक्ष  द्वारा राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली, कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ देवेंद्र गावंडे सरांनी  दिनांक ०३ जानेवारी २०२२ ते १२ जानेवारी २०२२ पर्यन्त राबवत असलेल्या या उपक्रमाविषयी सदिच्छा  दिल्या. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र वनोजा मुख्य आरोग्य परिचारिका सौ पद्माताई नेरकर यांची उपस्थिती होती. डॉ पुजा गजरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वनोजा यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून  महिलांमधील हिमोग्लोबिन आणि आहार  यावर  सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन प्रा डोंगरे यांनी केले. व आभारप्रदर्शन प्रा जयाप्रभा भगत मॅडम ( आय क्यू ए सी समन्वयक) यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील डॉ बोरचाटे, प्रा भगत, प्रा लहासे, डॉ घोंगटे, प्रा तृषाल राऊत, प्रा चेतन महल्ले सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी श्री पांडुरंग दाबेराव, श्री ज्ञानेश्वर मिसाळ, श्री संजय  गांजरे आणि प्रवीण गावंडे, योगेश बानूबकोडे, नयन राठोड सुमित राठोड सागर राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments