मंगरुळपीर ◆
हिंदू स्मशानभूमीत अग्निदाह करणारे मसनजोगी आणि मुस्लिम कब्रस्थानात कबर खोदकाम करणाऱ्या सेवकांना मानधन सुरू करावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक अनिल गावंडे यांनी नगर पालिका प्रशासनाकडे १ जानेवारी रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
..... मसनजोगी देतात २४ तास अविरत सेवा
मृत्यूनंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या लोकांना कुठलेही मानधन मिळत नाही. तरी देखील ते २४ तास अविरत सेवा देतात. मंगरूळपीर येथे दोन हिंदू स्मशानभूमी असून दोन मुस्लिम कब्रस्थान आहेत. स्मशानभूमीतील अंत्यसंस्कारासाठी स्मशानजोगी व्यवस्था पाहतात; तर • मुस्लिम कब्रस्थानातील कबर खोदकामासह अन्य कामे रखवालदार करतात.
नगर परिषद आणि शासनही याबाबत उदासिन आहे. तथापि, संबंधित लोकांना उत्पन्नाचे इतर कुठलेही साधन नसून त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक समस्यांमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्यांना मासिक मानधन सुरू करावे, अशी मागणी गावंडे यांनी पालिकेच्या सभेत केली. त्यांच्या मागणीला सर्वपक्षीय
उपासमारीची वेळ आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्यांना मासिक मानधन सुरू करावे, अशी मागणी गावंडे यांनी नगर पालिकेच्या सभेत केली. त्यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. तसेच अकोला चौकाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करण्याचा ठरावही सभेत मांडला असता तो मंजूर झाल्याची माहिती गावंडे यांनी दिली. या कार्याचे कौतुक जिल्हाभर होत आहे
0 Comments