Ticker

6/recent/ticker-posts

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेत शालेय साहित्याचे वितरण


वाशिम - आद्य शिक्षीका, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी भाजपा शहर महिला मोर्चाच्या वतीने शहरातील सुंदरवाटीका परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन व इतर शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या वाशिम शहर सरचिटणीस सौ. छाया पवार (खडसे), नगरसेविका करुणाताई कल्ले, वच्छलाबाई जाधव, इंदिराताई बरेटी आणि सचिन शर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सील, खोडरबर व इतर शालेय साहित्य देण्यात आले. तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. मिळालेल्या भेटवस्तुने विद्यार्थ्यांना आनंद झाला होता. फुले जयंतीनिमित्त यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षीका यांचाही सत्कार करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments