Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचा भारतरत्न देवून गौरव करा : तेजराव वानखडे



वाशीम :   भारतीय स्त्री आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने विविध जबाबदार्‍या समर्थपणे पेलत आहे. त्यांच्या शैक्षणिक विकासाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या भारतातील पहिल्या शिक्षीका ज्ञानज्योती ह्या आहेत. भारत सरकारने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा यथोचीत सन्मान करुन त्यांना भारतरत्न देवून गौरवान्वीत करावे असे प्रतिपादन रिपाइं चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे यांनी स्थानिक आययुडीपी येथील रिपाइं कार्यालयामध्ये आयोजित जयंती कार्यक्रमात केले.
ज्ञानज्योती सावित्रीमाईचा विसर पडून चालणार नाही, भारतीय स्त्री अजूनही गुलामगिरी आणि अंधश्रध्देत जिवन जगत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना आजही घडत आहेत. विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला राज्य घटना अर्पण केली. भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार दिले. मात्र, हा अधिकार केवळ मतदानापुरता न वापरता सावित्रीमाई फुले यांनी सांगितल्याप्रमाणे मुलां-मुलींनी शिक्षीत करण्यासाठी वापरला गेला तर वेगाने प्रगती होईल, त्याचप्रमाणे आजच्या प्रत्येक स्त्री ने सावित्रीमाईचा आदर्श घेतला तर देशाचा सर्वांगीन विकास होण्यास वेळ लागणार नाही. आज स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे याचे सर्व श्रेय व सावित्रीमाई फुले यांनाच असून, प्रत्येक महिलांनी सावित्रीमाई फुले यांच्या विचाराचा आदर्श घेवून कर्मकांड व अंधश्रध्देला बळी न पडता आपला व आपल्या देशाचा विकास साधावा असेही शेवटी बोलतांना तेजराव वानखडे म्हणाले.
याप्रसंगी पकम चे जिल्हाध्यक्ष शेषराव मेश्राम, अभिनेते अरविंद उचित, पत्रकार संजय खडसे यांचेही समयोचीत भाषणे झालीत. यावेळी कार्यक्रमाला शाहीर दत्ता वानखडे, दिलीप कांबळे, शाहीर लोडजी भगत, जनार्धन भालेराव, सुरेश श्रृंगारे, उल्हास इंगोले, विष्णू वानखडे, विजय खाडे, धनंजय कांबळे, सिध्दार्थ पाटील, प्रकाश गवई, कवि राठोड, रवि राठोड, तुकाराम खडसे, माणिकराव जामणीक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अरविंद उचित व आभार दत्तराव वानखडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments