Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. सिद्धार्थ देवळे म्हणजे राजकारणातील अजातशत्रू - प्रा. सिद्धार्थ देवरेनिवडीबद्दल वंचित बहूजन आघाडीच्या वतीने भव्य सत्कार


वाशिम - जिल्ह्याचे राजकारण व समाजकारणातील एक प्रभावी, वैचारीक व दुरदर्शी व्यक्तीमत्व म्हणून डॉ. सिध्दार्थ देवळे यांच्याकडे पाहीले जाते. इतरांचे मन जिंकुन घेण्याची त्यांची हातोटी असून त्यामुळे ते राजकारणातील अजातशत्रू आहेत असे प्रतिपादन वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा महासचिव सिध्दार्थ देवरे यांनी केले.
    
डॉ. देवळे यांची वंचितच्या पश्चिम विदभर्र् कार्यकारणी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वंचित बहूजन आघाडीच्या वतीने ५ जानेवारी रोजी सिव्हील लाईन येथील सिंहगड कार्यालयात त्यांच्या भव्य सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी वंचितचे जिल्हाध्यक्ष रवींद्र देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. समाजकल्याण सभापती सौ. वनिता देवरे, मंगरूळपीरच्या नगराध्यक्षा तथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष गजाला खान, जिल्हा प्रवक्ता  सुभाष अंभोरे, जिल्हा सचिव राजाभाऊ चव्हाण, जिल्हा संपर्कप्रमुख माधव कांबळे, जिल्हा मार्गदर्शक गोविंदराव इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान भगत, जिल्हा सल्लागार नारायणराव मिटकरी, जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव हिवराळे, जिल्हा सचिव सोनाजी इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक रंगनाथ धांडे, जिल्हा संघटक मिलिंद उके, ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र मोरे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव देशमुख, जिल्हा सल्लागार अनिल गरकळ, जिल्हा परिषद गटनेते सुनील चंदनशिवे, जि.प. सदस्य प्रमोद लळे, पं.स. उपसभापती किशोर ढाकुलकर, जिल्हा मार्गदर्शक सुभाष राठोड, पं.स. उपसभापती रमेश राठोड, जिल्हा मार्गदर्शक दत्तराव गोटे, जि.प. सदस्य सुभाष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, वंचितचे शहर संपर्कप्रमुख संतोष इंगळे, शहर सल्लागार राधा धबाले, महिला अध्यक्षा मालती गायकवाड, शहराध्यक्ष भूषण मोरे यांची उपस्थिती लाभली.
    प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्यासह महापुरुषाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकातुन माजी जि.प. सदस्य राजाभाऊ चव्हाण यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर सत्कारमुर्ती डॉ. सिध्दार्थ देवळे यांचा अध्यक्ष, प्रमुख अतिथी तथा पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सोनाजी इंगळे, सुभाष राठोड, दतराव गोटे, संदीप सावळे, सुनील चंदनशिव, प्रा. रंगनाथ धांडे, गजानन भोयर, डॉ. रवींद्र मोरे, गजाला खान आदींनी आपल्या मनोगतातून डॉ. देवळे यांच्या स्वभावाच्या विविध छटा उलगडल्या. तसेच डॉ. देवळे यांच्या नेतृत्वात पाचही जिल्ह्यात वंचित बहूजन आघाडी राजकीय सत्ता हस्तगत करेल असा विश्वास व्यक्त केला.
    सत्काराला उत्तर देतांना डॉ. देवळे म्हणाले की, आपण आपल्या जीवनातील अनेक चढ-उतार सहज पार केले व प्रत्येक क्षणाला यशाचे शिखर सर केले. सर्व पदाधिकारी व नेत्यांच्या सहकार्याने श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशान्वये मिळेल त्या वेळात पाचही जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला राजकीय यशाच्या शिखरावर नेऊ असा ठाम निर्धार व्यक्त केला. शेवटी अध्यक्षीय भाषणात देशमुख यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देत यांच्या नेतृत्वात आम्ही तनमनधनाने त्यांच्यासोबत राहण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन प्रा. सुभाष अंभोरे यांनी केले तर आभार उत्तम झगडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments