वाशिम, दि. 06 :
रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने वाशिम तालुक्यातील टो येथे नुकतेच तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना रेशीम किटक संगोपनाबाबतचे शास्त्रीय प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण टो येथील शेतकरी माधव बोरकर यांच्या शेतामध्ये देण्यात आले. तुती लागवड करुन रेशीम किटकांचे शास्त्रोक्त पध्दतीने संगोपन याविषयी जिल्हा रेशीम अधिकारी श्री. मोरे यांनी एकर शेतीतून जवळपास 1 ते 4 लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळू शकते. तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीची कास धरावी आणि आपली उन्नती करुन घ्यावी. असे आवाहन याप्रसंगी श्री. मोरे यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णूपंत खाडे, सरपंच श्री. हराळ, प्रगतीशिल शेतकरी श्री. जोगदंड, सामाजिक कार्यकर्ते श्री. हराळ, टो येथील 50 ते 60 शेतकरी उपस्थित होते.
सध्या रेशीम कोशांना प्रति क्विंटल 70 हजार रुपये दर असल्याने रेशीम शेती फायदेशीर आहे
0 Comments