Ticker

6/recent/ticker-posts

व्यंगचित्रकार गणेश वानखडे यांची संभाजी ब्रिगेडच्या विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी निवड


मंगरुळपीर : मराठा सेवा संघ प्रणित वैचारिक तरुणांचे बलशाली संघटन अशी ओळख असलेल्या संभाजी ब्रिगेडची नुकतीच वाशिम येथे बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या हस्ते आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून सतत चर्चेत असलेले मंगरुळपीर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार गणेश वानखडे यांची संभाजी ब्रिगेडच्या विभागीय प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर, वाशिम (पूर्व) जिल्हाध्यक्ष डॉ.प्रशांत गावंडे, वाशिम (पश्चिम) जिल्हाध्यक्ष अर्जुन खरात, पदवीधर विभागीय अध्यक्ष प्रा.गोपाल वांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

वाशिम येथील घे भरारी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे ही बैठक पार पडली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments