प्रतिनिधी:- वनोजा
श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा ०३ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत सावित्रीच्या लेकींचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे या नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महिला सक्षमीकरण कक्ष व राष्ट्रिय छात्र सेना आणि राष्ट्रिय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सुरक्षा व शक्ती कायद्याचे मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय जी जगदाळे सर सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री वळदकर सर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आय क्यू ए सी विभाग प्रमुख प्राध्यापिका जे एम भगत मॅडम उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक
महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण विभाग प्रमुख डॉ ममता पथ्रिकर यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये महिला सुरक्षा व शक्ती कायद्यांच्या बद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात सावित्रीच्या लेकी चा नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. महाविद्यालयाला प्रमुख अतिथी लाभलेले श्री धनंजय जगदाळे सर यांनी महिला शक्ती कायदा २०२१ पोक्सा २०१२ आणि इतर समाज दृष्टिकोनातून महत्त्वाच्या कायद्यांबद्दल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती सांगितली त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंजुषा मोरे मॅडम आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये जर कोठे काही घटना अथवा गुन्हा घडत असेल तर आपत्कालीन क्रमांक ११२ चा नागरिकांनी तसेच महिला सुरक्षितेसाठी पोलीस विभागाद्वारे येणार्या कर्तव्याचा उल्लेख आपल्या मार्गदर्शन पर
व्याख्यानत केला पोलीस निरीक्षक वळदकर सर यांनी एनसीसीच्या कॅसेट्स ना आणि महाविद्यालयीन विद्यार्थी एस एल आर पिस्टल या सैनिकी हत्यारं बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले व कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्रा जे एम भगत मॅडम यांनी कायद्याच्या चौकटीत महिला खरोखर सुरक्षित आहे. महिलेच्या बाबतीत कायदे माहित असावे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रा डॉ देवेंद्र गावंडे सर उपस्थित होते व राष्ट्रिय सेवा येजनेचे समन्वयक प्रा डोंगरे सर, एन सी सी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट डॉ सुनील बोरचाटे, एनसीसी विभागाचे केअर टेकर प्राध्यापक पथ्रिकर सर मराठी विभागाचे प्रमुख डॉ गजानन घोंगटे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा लहासे सर इंग्रजी विभाग प्रमुख भगत सर तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. महिला सुरक्षा व शक्ती कायदा या संयुक्त विद्यमानाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी कॅडेट अश्विनी राठोड हिने केले. तर आभार प्रदर्शन एनसीसी कॅडेट लान्सकारपोरल ऋषिका राऊत हिने केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि महिला सक्षमीकरण समितीच्या प्रतिनिधींनी वैष्णवी पाटील, अंजली सोनोने, पूनम राऊत, वैष्णवी राऊत, मंजुषा इंगोले यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे छायाचित्र व वृत्तसंकलन एनसीसी कॅडेट प्रवीण गावंडे यानी केले.




0 Comments