Ticker

6/recent/ticker-posts

सरकार सेवा केंद्र40 गावांसाठी उमेदवारांची निवड21 गावांसाठी ईश्वर चिठ्ठीने होणार निवड


वाशिम : आपले सरकार सेवा केंद्र नसलेल्या जिल्हयातील 61 गावांपैकी समितीने निवड केलेल्या 40 गावांची व अर्जदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच www.washim.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उर्वरित 21 गावांसाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने 6 जानेवारी रोजी ईश्वर चिठ्ठीने उमेदवारांची आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी निवड करण्यात येणर आहे.

आपले सरकार सेवा केंद्र चालविण्यासाठी निवड झालेली 40 गावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. रिसोड तालुका- आगरवाडी, जवळा व धोडप (खु.), मालेगांव तालुका- कुत्तरडोह, कोलदरा, खडकी इजारा, झोडगा (बु.) व बोरडी , मानोरा तालुका- अजणी, तोरनाळा, देऊरवाडी व बोरव्हा, मंगरुळपीर तालुका- चोरद, जांब, निंबी, पिंप्री (बु.), भुर, मसोला (खु.), वरुड (बु.) व पिंप्री (खु.), कारंजा तालुका- कामठा, कोळी, गिरडा, जानोरी, डोंगरगांव, धोत्रा, निंबा (जहाँ.), पिंपळगांव (बु.), भडशिवणी, भिवरी, माळेगांव, मुरंबी, मोहगव्हाण, रामनगर, रहाटी, वडगांव (इजिरा), शिवनगर, शिरसोली, वाशिम तालुका- अडगांव (खु.) या गावांमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार आहे.

ज्या 21 गावांकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्याने 6 जानेवारी रोजी ईश्वर चिठ्ठीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये मालेगांव तालुका- काळा कामठा, कुरळा, देवठाणा खांब, मसला (खु.), वाघळुद, सुदी. मानोरा तालुका- गोस्ता व  सोमनाथ नगर. मंगरुळपीर तालुका- बेलखेडा व मोतसावंगा. कारंजा तालुका- कार्ली, खानापूर, जयपूर, बेंबळा, बेलमंडळ, विरगव्हाण, शिवणी (बु.), इंझा आणि वाशिम तालुका- वाघोली (बु.), किनखेडा व शिरपुटी या गावांचा समावेश आहे.   

Post a Comment

0 Comments