वाशीम : समाजसेवी स्व. मदनलाल गट्टाणी यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमीत्त केकतउमरा येथील चेतन सेवांकुर ग्रुपला गटटाणी परिवाराच्या वतीने दोन महिण्याचे किराणा साहित्य, भेटवस्तु , अकोला येथील सौ. ज्योतीताई चरखा यांच्याकडून 5100 रूपयाची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. यावेळी चेतन सेवांकुर ग्रुपच्या दिव्यांग बांधवांनी आपल्या कलेचे प्रदर्शन करीत चित्रपट गिते, भावगिते, भक्तीगिते सादर करून उपस्थितांना जिंकले. यावेळी गट्टाणी परिवाराचे सुनिल गट्टाणी, सौ. माया गट्टाणी, अक्षय गट्टाणी, सौ. मेघा गट्टाणी, वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल भुतडा, कैलास मुंदडा, निलेश सोमाणी, जुगलकिशोर मंत्री उपस्थित होते. यावेळी गट्टाणी परिवाराचे अक्षय गट्टाणी व मेघा गट्टाणी यांनी पांडूरंग उचितकर व सौ. गंगाताई उचितकर यांना आकर्षक भेट वस्तु , ट्रॅव्हलींग बॅग भेट दिली. कार्यक्रमामध्ये सुनिल गट्टाणी, निलेश सोमाणी यांनी आपल्या मनोगतातून चेतन सेवांकुर ग्रुपच्या माध्यमातून वाशीमचे नाव राष्ट्रीय स्तरावर झळकल्याने समाधान व्यक्त केले. यावेळी सौ. माया गट्टाणी व अक्षय गट्टाणी यांनी गित सादर करून कार्यक्रमात रंगत भरली. सदर कार्यक्रमात बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती यांच्या वाढदिवसही साजरा करण्यात आला. वाशिम जिल्हा माहेश्वरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा यांनी चेतन सेवांकुर व ग्रुपचे चेतन उचितकर यांना रोख रक्कम प्रदान केली. कार्यक्रमाचे संचालन पांडूरंग उचितकर आभार यांनी केले.
0 Comments