Ticker

6/recent/ticker-posts

स्वच्छता दुतांमुळे जिल्ह्याचे नाव लौकीक



           वाशिम जिल्हा प्रशासनाला पडला संगीताताईच्या कार्याचा विसर , तोंडावरचे बोंड  हाणाऱ्यांचा केला जातो उदोउदो ,राजकीय पाठबळ नसल्यामुळेच संगीताताईच्या कार्याला विसरले.
सपूंर्ण जिल्ह्याला नव्हे तर देशाला स्चच्छतेचा संदेश देवून राज्ज्याच्या स्वच्छता दुताचे कार्य करीत असलेल्या
संगीता अव्हाळे मुळे स्वच्छतेचा जिल्ह्या म्हणुन वाशिम जिल्ह्याचे नाव लौकीक झाले आहे. 
देशाचे प्रधान मंञी नरेद्र मोदी यांनी 2 आक्टोंबर 2014 रोजी गांधी जयंती निमित्त स्वच्छतेचा संदेश दिला.त्याचा खरा अर्थ मंगरूळपिर तालूक्यातील सायखेडा या छोटशा गावातील संगीता अव्हाळे या महीलेला गवसला. संगीताताईने सौभाग्य अलंकार विकुन शौचालय बांधले.त्यानंतर तिला चांगलाच विरोध झाला.
माञ माजी ग्रामविकास मंञी पंकजाताई मुंडे यांनी संगीताताईला मंगळसुञ देवून सन्मानित करुन शौचालयाचे अनुदान 4600 हून  लगेच अनुदानात वाढ 12000 रुपये केले.आज राज्ज्याला बारा हजार मिळतात ते केवळ संगीताताईमुळेच 
तात्कालीन जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी अव्हाळे यांच्या कार्याची दखल घेवून वाशिम जिल्ह्याच्या बॅडअँम्बेसिडर 
 म्हणुन घौषीत केले.त्यावेळी संगीता अव्हाळे यांनी वाशिम जिल्ह्यात 7000 शौचालयाचे भुमीपुजन केले होते.तेव्हा  
विभागीय आयुत्तांनी संगीताताईला विभागाच्या बॅडअँम्बेसिडर बनवले.
वाशिम यवतमाळच्या खासदार भावनाताई गवळी यांनी सांसद ग्राम योजनेतून सायखेडा गाव दत्तक घेवून संगीताताईच्या कार्याची पावती देत ग्राम विकास घडवला.
मा.मुख्यमञी देवेद्र फडणविस यांनी संगीताताई अव्हाळे यांना राज्ज्याच्या स्चच्छता दुत म्हणून जाहीर करुन वाशिम जिल्ह्याचे नाव लौकीक केले.आणि तेव्हापासूनच स्वच्छतेची चळवळ सुरु झाली. ती अजून पर्यंत सुरूच आहे वाशिम जिल्हाप्रशासन  जरी हे विसरले असेल माञ अभिताब बच्चन, गोविंदा , प्रियंका चोप्रा, सचिन तेंदूलकर, हेमा मालीनी,या सारख्या दिग्गजांनी संगीताताईच्या कार्याचे कौतूक करुन सन्मानित केले.


दिल्ली येथे दरवर्षी स्वच्छतेवर आधारीत कार्य करणार्‍यांचा सन्मान होतो.त्यामध्ये वाशिमच्या संगीताताईचे नाव घेतल्या जाते त्यामुळे जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उजळले यात काहीशंकाच नाही.
शब्दांकन
जयश्री गो. माचलकर
त्यांच्या वाढदिवसा निम्मीत त्यांच्या कार्याला वाशिम खबर आवाज महाराष्ट्राच्या वतीने माझा मानाचा मुजरा

Post a Comment

0 Comments