वाशिम पोलीस दलाचे वतिने कोटांत चालणारे खटल्यातील पिडीतांना न्याय मिळावा व आरोपीतांना शासन व्हावे यादृष्टीने नियमीत प्रयत्न सुरु आहेत. त्याकरीता टि.एम.सी. सेल कार्यान्वीत करन पो.स्टे. कडून नेमण्यात आलेले कोर्ट परबी यांचे मार्फत प्रत्येक न्यायप्रविष्ट गुन्ह्यात दोषसिध्दी करीता पाठपुरावा करण्यात येत आहे.. मागील वर्ष २०२१ व चालू वर्ष २०२२ आज पावेतोचे कालावधीत मा.पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात वाशिम पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे पुढील प्रमाणे गुन्ह्यातील आरोपीतांना मा न्यायालयात दोषसिध्दी प्राप्त झाली आहे. ● जन्मठेप खूनाचे ३ गुन्ह्यातील ३ वेगवेगळ्या आरोपींना जन्मठेप व इतर ९ आरोपीतांना प्रत्येकी ३ महीने कारावास व नमुद तीन गुन्ह्यात एकून ४८,०००/- रु.चा दंड ठोठावण्यात आला आहे.
• १० वर्ष व त्यापेक्षा जास्त कारावास: बलात्कार व POCSO चे गुन्ह्यातील एक आरोपीस १० वर्ष कारावास व नगदी ६,०००/- रुदंडाची शिक्षा झाली आहे.
• ७ वर्ष कारावास: बलात्कार, POCSO चे १ च सदोष मनुष्य वधाचे गुन्ह्यातील प्रत्येकी १ आरोपीस ७ वर्ष कारावास व नमुद तीन गुन्ह्यात एकून १७,०००/- रु.चा दंड ठोठावण्यात आला आहे.
२० ३ वर्ष कारावास:- विनयभंग POCSO चे २, सरकारी नौकर हमला १ व दुखापतीचे १ गुन्ह्यातील प्रत्येको १
आरोपीस ३ वर्ष कारावास व नमुद चार गुन्ह्यात एकून १३,०००/- रुचा दंड ठोठावण्यात आला आहे. • १ वर्ष कारावास:- विनयभंग व POCSO चे २ व दुखापतीचे २ गुन्ह्यातील प्रत्येकी १ आरोपीस १ वर्ष कारावास
य नमुद चार गुन्ह्यात एकून ५,५००/- चा दंड ठोठावण्यात आला आहे. • १ वर्षा पेक्षा कमी शिक्षा झालेले गुन्हे:- चोरीचे ८ गुन्ह्यात अपघाताचे १ गुन्ह्यात व दुखापतीचे १ गुन्ह्यातील आरोपीतांना प्रत्येकी ७ ६५४३ महीने १ महिना अशा वेगवेगळ्या कारावासासह २,०००/- रुपये दंड
ठोठावण्यात आला आहे.
असे वरील प्रमाणे गंभीर गुन्हयातील एकूण ३३ आरोपीतांना मा न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे य
त्यांना ९९,५०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे याव्यतिरीक्त वाशिम घटकातील सर्व पोलीस स्टेशन चे विशेष स्थानिक कायदे व इतर गुन्हयामधील शिक्षे
बायत माहिती खालील प्रमाणे आहे > कलम १२(अ) महा, जुगार कायद्याचे ६९४ गुन्ह्यातील एकून १२४७ आरोपीतांना ३,०२,०२०/-रु. नगदी दंड झाला.
कलम १८४, १८५ मोटार वाहन कायद्या प्रमाणे एकून ६६ गुन्ह्यातील ६६ आरोपीतांना ३५,४००/- रुपये नगदी दंड झाला, > तसेच इतर किरकोळ १७४७ गुन्ह्यातील एकून १७७४ आरोपीतांना ५,७५,०५०/- रुपये नगदी दंड झाला आहे.
> वाशिम पोलीस दलात मागील वर्षात एकुण १६५४ आरोपी अटक करण्यात आले आहे अशा वरीलप्रमाणे सर्व गंभीर व किरकोळ गुन्ह्यांमध्ये दोपसिध्दी प्राप्त झाली असून याकरीता सर्व
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, टि.एम.सी.सेल वाशिम व सर्व पो.स्टे. कडून नेमण्यात आलेले कोर्ट पैरवी यांनी वेळोवेळी मा.पोलीस अधिक्षक साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक साहेब यांचे मार्गदर्शनात उत्कृष्ट कामगोरी करुन गैरकृत्य करणारे व्यक्तींना शासन होणेस प्रयत्न केले आहेत. त्याच प्रमाणे महीलांविरुध्दचे, बाल लैंगिक अत्याचाराचे आणि इतर सर्वच गुन्ह्यातील जास्तीतजास्त आरोपांतांना शासन होईल याकरीता वाशिम पोलीस दला तर्फ सातत्याने आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत.
0 Comments