Ticker

6/recent/ticker-posts

अमरावतीत महिला पोलिसांचे झुंबा नृत्य, फेटे परिधान करून घेतला सहभाग

 अंबा नगरीत महिला पोलिसांसाठी महिला दिनानिमित्त झुंबा नृत्याचे आयोजन . यावेळी महिला पोलिसांनी फेटे परिधान केले होते. अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मरावती : वर्षभर महिला पोलीस अधिकारी  आणि महिला पोलीस कर्मचारी या आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असतात. परंतु जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. अमरावतीमध्येही जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने डॉ. आरती सिंह , पोलीस आयुक्त अमरावती शहर तसेच रोटरी ग्रुप ऑफ अमरावती अंबानगरी आणि शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांच्या सहभागाने महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या झुंबा नृत्याचे  आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पोलिसांनी मनसोक्तपणे या नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी सर्व महिला पोलिसांनी फेटे परिधान करून या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments