अखेर शासनाने शेतकऱ्याची शेत जमीन ताब्यात घेतली
अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा चौपदरीकरण बांधकामात शासनाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या असून त्यामधे मोठ्या प्रमाणात गोंधळात गोधळ झाल्याचे दिसून येत आहे.रस्ता सर्वेक्षनात शासकीय अधिकाऱ्यांनी अनेक घोडचूका केल्याने शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.शासनाने शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला करोडो रुपये मंजूर केला आणि चूक झाल्याचे कारण पुढे करून करोडो रुपये रक्कम रद्द करुन केवळ ७ लाख रुपये मोबदला देण्याची नोटीस मेडशी येथील कास्तकाराला बजावली.त्या कास्तकाराने दर मूल्यांकावर आक्षेप नोंदवत जमिनीचा ताब्यात देण्यास नकार दिला.अखेर शासनाने ती जमिन ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.
शासनाने अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामासाठी मेडशी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे दर मूल्यांकन निश्चित करून अधिग्रहित केल्यात.त्याचा चांगला मोबदला देण्यात आल्याने शेतकरी मालामाल झाला.मात्र मेडशी येथील शेतकरी दिनकरराव वामनराव घुगे यांच्या गट क्रमांक २८२, ०.२५ हे आर. शेत जमिनीला हाय वे सन्मुख दर मूल्यांकन १ करोड ४० लाख रुपये निश्चित केले.त्याबाबतची नोटीस सदर शेतकऱ्याला देण्यात आल्याने शेतकरी आनंदित झाला असताना लगेच त्याच्या आनंदावर विरझन पडले.
शासनाने चूक झाल्याचे कारण पुढे करत शेतकऱ्याला केवळ ७ लाख रुपये मोबदला देण्यात येणार असल्याची नोटीस बजावली .सदर प्रकरणात त्या शेतकऱ्याने आक्षेप नोंदवत जमीन शासन ताब्यात देण्यास नकार दिला तब्बल ३ वर्षापासून प्रकरण रेंगाळत पडले असल्याने अखेर शासनाने पोलिस बंदोबस्तात सदर शेत जमीन ताब्यात घेण्याची कार्यवाही केली.
सदर कार्यवाही तहसीलदार रवी काळे,पोलिस निरीक्षक किरणकुमार वानखडे, उपनिरीक्षक पुष्पलता वाघ,मेडशी बिट जमादार भीमराव चव्हाण,जमादार गजानन पांचाळ,पोलिस नायक शैलेंद्र ठाकूर,पोलिस कर्मचारी अमोल पाटील,सुरेंद्र तिखिले,गजानन झगरे,आशिष बीडवई,महिला पोलिस कर्मचारी ,मंडळ अधिकारी इंगळे,तलाठी ,घुगे,गजानन कोतवाल
घनश्याम साठे,आरोग्य अधिकारी, डॉ शुभम सपकाळ आदींच्या पथकाने केली.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments