Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीरमध्य नगराध्यक्षांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ; दत्तामामा भरणे यांच्या हस्त आज उद्घाटन

वाशिम | मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरातील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध विकासकामांशी संबंधित प्रश्नांना तत्परतेने प्रतिसाद मिळावा, यासाठी नगराध्यक्ष अशोकभाऊ महादेवराव परळीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात करण्यात येत आहे.

या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता महात्मा ज्योतिबा फुले चौक येथील सोनाई कॉम्प्लेक्स, मंगरुळपीर येथे आयोजित करण्यात आला आहे.

राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा कृषिमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

शहरातील नागरिकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे तसेच शासकीय योजना, नागरी सुविधा आणि विकासकामांशी संबंधित प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, नागरी सुविधा तसेच विविध शासकीय कामांबाबतच्या नागरिकांच्या अडचणी या कार्यालयाच्या माध्यमातून संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, नगरपरिषद प्रतिनिधी, शहरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिक आणि प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण होऊन मंगरुळपीर शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या उद्घाटन सोहळ्यास मंगरुळपीर शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगराध्यक्ष अशोकभाऊ महादेवराव परळीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments