Ticker

6/recent/ticker-posts

वनोजा येथिल सेवा सहकारी संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडासर्व १३ पैकी १३ ही उमेदवार अविरोध


प्रतिनिधी:- वनोजा

मंगरूळपीर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा येथील सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका २०२२ ते २०२७ जाहीर झाल्या होत्या २८ फेब्रुवारी ते ७ मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येत होते. मात्र शेवटच्या दिवशी  सेवा सहकारी सोसायटीच्या तेरा जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तेराच नाम निर्देशन पत्र दाखल करण्यात आले. यामागे म्हणजे माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यामुळे ही निवडणूक अविरोध झाली आहे.  अविनाश पुंडलिकराव राऊत, राजेश रामदास महल्ले, रामेश्वर प्रल्हाद राऊत, राजेश सुखदेवरव राऊत, अशोक तुळशीराम चांभारे, रमाबाई रामदास इंगोले, बेबीबाई रामचंद्र इंगोले, विजय उद्धव हेकड, मोहन लक्षमन पानभरे, जिवन जानुशिंग पवार, गणेश देवलाल आडे, समीप दादाराव राऊत, किसन झाळुजी इंगोले हे तेराही उमेदवार अविरोध झाले आहे.

Post a Comment

0 Comments