Ticker

6/recent/ticker-posts

छ.शिवाजी महाराज चौकात तलवारीसह वाहन जप्त, एक आरोपी ताब्यात

प्रतिनिधि
महेन्द्र मिश्रा
बुलढाणा

शेगांव : छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेगांव गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती मिळाल्यावरून तलवारीसह वाहन जप्त करण्यात आले आहे. तर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत शेगांव शहर पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दिनांक ५ मार्च रोजी गुन्हे शोध पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निंबा फाट्यावरून शेगाव कडे एक पांढऱ्या रंगाची टाटा सुमो गाडी क्रमांक एम एच ३० पी ८६२ येत आहे. त्या गाडीच्या पाठीमागील भागात सीटच्या खाली तलवार ठेवलेल्या आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे दुपारी साडेबारा वाजता टाटा सुमो क्रमांक एम. एच ३० पी. ८६२ पोलिसांना येताना दिसली सदर टाटा सुमो गाडी पोलीसांनी थांबवून वाहनांची झडती घेतली. यावेळी पाण्याच्या पाठीमागील दरवाजा उघडून पाहिले असता त्या डाव्या साईडच्या बाजूने सिटखाली एक लोखंडी पात्याची सिल्वर रंग असलेली तलवार मिळून आली. मिळालेल्या तलवारीचे वर्णन रंग सिल्वर समोरील बाजूने निमुळती होऊन अनकुचीदार टोक असलेली आणि खालील बाजूने पकडण्याकरिता मूठ तसेच मुठीसह तलवारीची लांबी ३६ इंच लांब, मुठीपासून पात्याची लांबी २९ इंच, मुठीची रुंदी ७ इंच, लोखंडी पात्याची रुंदी १.५ इंच अशी असून तलवारीची किंमत अंदाजे ५ हजार रुपये आहे. याप्रकरणी वाहन चालक आशिष शहा युसूफ शहा वय ४२ वर्ष राहणार हरी फाईल आजाद नगर खामगाव यास तलवार बाळगण्या बाबत परवान्याची विचारपूस केली असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यावरून गुन्हे शोध पथकाने त्याच्या ताब्यातून पाच हजार रुपये किमतीची पात्याची तलवार आणि तीन लाख रुपये किंमतीची टाटा सुमो पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक एम. एच ३० पी. ८६२ जप्त करण्यात आली असून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रवणकुमार दत्त एस, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी शेगाव शहर ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक नितीन इंगोले, पोलीस हवालदार गजानन वाघमारे, पोलीस नाईक गणेश वाकेकर, राहुल पांडे पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर नागरे, ज्ञानेश्वर राठोड यांनी केली असून पुढील तपास गुन्हे शोध पथक शेगांव शहर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments