Ticker

6/recent/ticker-posts

नवनीत राणा यांची हक्कभंगाची तक्रार; मुंबई,अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना दिल्लीत


नवनीत राणा यांची हक्कभंगाची तक्रार; मुंबई,अमरावतीच्या पोलिस आयुक्तांना दिल्लीत पाचारण

अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीची संसदीय विशेषाधिकार समितीकडून दखल घेण्यात आली आहे. समितीने पोलिस महासंचालक, मुंबईचे पोलिस आयुक्त, अमरावतीचे पोलिस आयुक्त तसेच उपायुक्तांना येत्या ६ एप्रिलला दिल्लीत पाचारण केले आहे.
खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या प्रस्तावावर ६ एप्रिलला दुपारी तीन वाजता संसद भवनातील समितीच्या कक्षात सुनावणी होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग व तत्कालीन उपायुक्त शशिकांत सातव यांना वेळेवर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले.खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी पोलिसांनी खासदार व आमदारांना स्थानबद्ध केले होते. स्थानबद्ध केल्यानंतर आपल्याला आरोपीसारखी वागणूक देण्यात आली असा खासदार नवनीत राणा यांचा आरोप आहे. त्यांनी या संदर्भात संसदेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली. त्या अनुषंगाने समितीच्या उपसचिवांनी यांनी २९ मार्च रोजी या चार अधिकाऱ्यांना पत्र पाठवून समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments