Ticker

6/recent/ticker-posts

समर्थनगरात जयंती निमित्त महाप्रसाद !

                              वाशिम ,श्रीदत्तावतार सद्‌गुरु श्री स्वामी समर्थ महाराज जयंती महोत्सवा निमित्त, स्थानिक श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, समर्थनगर, अकोला रोड, वाशिम येथे, श्री स्वामी समर्थ महाराज जयंती निमित्त त्यांच्या कृपाप्रसादाने, चैत्र शु प्रतिपदा गुडीपाडवा शनिवार,दि .02/04/2022 रोजी रात्री 08 :00 ते 10 :00 पर्यंत, हभप दिनकर महाराज जायभाये ( भर जहाँगीर ) यांचे किर्तन, चैत्र शु द्वितीया रविवार, दि.03/04/2022 रोजी प्रातःकाळी श्रींचा अभिषेक, सकाळी हभप नामदेव महाराज काकडे ( भागवताचार्य वाशीम) यांचे काल्याचे किर्तन होईल त्यांना साजसंगत ,गायनाचार्य विदर्भभूषण हभप मनोहर महाराज कोठेकर, हभप विठ्ठल महाराज, मृदंगाचार्य हभप गजानन महाराज कव्हरकर तसेच हभप हरिबापू महाराज वारकरी शिक्षण संस्था कोठा यांच्या भजनीमंडळ व टाळकऱ्यांची राहील . त्यानंतर दुपारी ठिक 01 :00 वाजता श्रींचा महाप्रसाद होईल सदर्हु कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ सेवा समिती तथा समर्थनगर रहिवाशी भाविक मंडळीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पंचांगे (गुरुजी ) यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments