अमरावती : जिल्ह्यातील प्रतिष्ठित सातुर्णा परिसरात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधील मुख्याध्यापकाने चक्क पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाचे शाळेतच केस कापून ‘बॅड टच’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्याध्यापकाच्या या कृत्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडीलांनी राजापेठ पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन तत्काळ अटक केली आहे.प्रतिष्ठीत इंग्रजी शाळेत पहिलीत वर्गात शिकणारा सहा वर्षांचा चिमुकला शाळेत गेला. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याला आपल्या कार्यालयात बोलावून विचित्र व हेकेखोरपणे त्याच्या डोक्यावरचे केस कापले. वास्तविकता मुलाचे केस फार वाढलेले नव्हते, असेही तक्रारीत नमूद आहे. यावेळी मुख्याध्यापकाने मुलाला ‘बॅड टच’सुद्धा केला.
हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थी घाबरला व सोमवारी सायंकाळी त्याने घडलेला प्रकार रडत रडत त्याच्या पालकांना सांगितला. व्यवसायाने डॉक्टर असलेले मुलाचे वडील मुख्याध्यापकाला भेटण्यासाठी शाळेत गेले. त्यावेळी मुख्याध्यापकाने मुलाच्या वडीलांसोबत अंत्यत वाईट वर्तन करुन ‘ही शाळा कोणाची आहे, ‘तुला माहीत नाही का, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकाला तत्काळ अटक केली असल्याचे राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले. तो तुझा बाप आहे. तुला काय करायचे ते करुन घे, आमचे कोणीही काही करु शकत नाही’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापकाला तत्काळ अटक केली असल्याचे राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी सांगितले.
- Home-icon
- महाराष्ट्र
- मुंबई
- __पालघर
- __ठाणे
- __मुंबई नगर
- __मुंबई उपनगर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- पुणे
- __पुणे
- __सातारा
- __कोल्हापूर
- __सांगली
- __सोलापूर
- नाशिक
- __नाशिक
- __अहमदनगर
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- औरंगाबाद
- __औरंगाबाद
- __जालना
- __परभणी
- __हिंगोली
- __नांदेड
- __बीड
- __लातूर
- __उस्मानाबाद
- अमरावती
- __अमरावती
- __वाशीम
- __अकोला
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- ई-पेपर
- राजकीय घडामोडी
- क्राईम
- देश – विदेश
- शासकीय
- शेती/शेतकरी
- लेख
- ताज्या बातम्या
- YOUTUBE(युट्युब)
0 Comments