Ticker

6/recent/ticker-posts

महिला सक्षमीकरणासाठी महिलांचेसुद्धा महत्वाचे योगदान माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे




मंगरुळपीर
8 मार्च 2022 रोजी महिला सक्षमीकरण कक्षा मार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समीती सभाग्रुहात आज रोजी महिला जागतीक दिना निमीत्त महीलांना ठाकरे परीवाराकडुन सन्मानित करुन अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करत महीला कुटुंब सांभाळण्यापुरत्याच मर्यादित नसून कुटुंबाच्या प्रगतीतसुद्धा त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी महिलांचेसुद्धा मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी केले.येथील पंचायत समितीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्य आयोजित महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे होते तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,पं स सभापती हरीष महाकाळ,तहसीलदार शितल बंडगर,गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, पालिका मुख्याधिकारी दिपक इंगोले,भाऊराव व्यवहारे,नारायणराव बारड, प्रियाताई ठाकरे,शीतलताई ठाकरे,जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई कोठाळे,नंदाताई डोफेकर,निलीमताई देशमुख,कु कांचन मोरे,पंचायत समिती सदस्य राधिकाताई ठाकरे,उषाताई राठोड,अरुणाताई राठोड,अनिताताई इंगोले,शेख आरिफाबी,मीनाताई राऊत,रेखाताई भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या महिलांचा ठाकरे परिवाराच्या वतीने स्व कोकिळाबाई ठाकरे स्मृतीप्रित्यर्थ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,तहसीलदार शीतल बंडगर,जि प सदस्या सुनीता कोठाळे,पं स सदस्या राधिकाताई ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर भाऊराव बेलखेडकर व राहुल भगत यांनी बचत गटविषयी योजनांची महिलांना प्रास्ताविकातून माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक राऊत यांनी केले तर आभार गणेश ढोबळे यांनी मानले.यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments