वाशिम - युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार आणि नेहरू युवा केंद्राच्या पुढाकारातुन शनिवार, ५ मार्च रोजी सामाजीक न्याय भवनातील सभागृहात आयोजीत जिल्हास्तरीय लोककला सांस्कृतिक महोत्सवात येथील कला व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थीनींनी उत्कृष्ट कलागुणांचे प्रदर्शन घडवित जिल्ह्यातून प्रथम क्रमांक खेचून आणला. या विद्यार्थीनींना कलाशिक्षक अमोल काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाला शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक, जिल्हा युवा समन्वयक आशिष पंत, लेखाधिकारी अनिल देंगे, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादुर यांची उपस्थिती लाभली. यावेळी महोत्सवात विद्याथीनींनी मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘मराठीचा जागर’ या गाण्यावर पारंपारीक लुगडे परिधान करुन बहारदार लोकनृत्य सादर केले. विद्यार्थीनींच्या या कलागुणांना परिक्षकांनी व प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली. या महोत्सवातील लोकनृत्य कलाप्रकारात बाकलीवाल शाळेला प्रथम क्रमांक मिळाला. आमदार अॅड. किरणराव सरनाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थीनींना प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह, पदक देवून गौरविण्यात आले.
0 Comments