८ मार्चचा जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाईल, परंतु जागतिक महिला दिनाच्या केवळ एक महिना आधी मंगरूळपीर तालुक्यातील निंबी गावामध्ये परिचारिकेच्या हलगर्जीपणामुळे दोन महिन्याच्या गोंडस बालिकेला जीव गमावावा लागला आहे.
निंबी येथे ८ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी तिन वाजता गावातील अंगणवाडी क्रमांक एकमध्ये लसीकरण देण्यात आले असता त्यामध्ये त्या बालिकेला चार इंजेक्शन व पोलिओचे दोन - तिन ड्रॉप्स पाजण्यात आले. व त्यानंतर तिचा मेंदू निकामी झाल्यामुळे तिचे अवयव बंद पडले. त्यानंतर मुलीच्या वडीलांनी तिला वाशिम खाजगी रुग्णालयात भरती केले. तिथे तिची तब्येत खालावल्याने परत तिला अकोला येथे हलविण्यात आले. तिला दिल्या गेलेल्या डोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे १५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्या मुलीची प्राणज्योत मालवली. या बाबीची सविस्तर माहिती सहयोगी डॉक्टर काजी व सहयोगी परिचारिका वाडेकर यांना कळवूनही त्यांच्याकडून फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मुलीचे वडील केशवराव आडे यांनी याबाबत संबंधित आरोग्य विभागाकडे तक्रार दाखल करूनही अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हलगर्जी नि काम करणाऱ्या दोषीवर कारवाई होण्यासाठी केशवराव आडे यांनी ९ मार्च पासून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोरण उपोषण करण्याचा संकल्प केला असून आपल्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची आई वडिलांची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले निवेदन प्रशासन न्याय देईल का अशी उलट-सुलट चर्चा मात्र जनसामान्यात होत आहे . निष्पाप मुलीचा मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधितावर प्रशासन काय कारवाई करणार
0 Comments