Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम येतील तीरुपती सीटी आणी नगरपरिषद मधील सहा ठीकाणी असलेल्या आगमोहांना काढुन नागरिकांना सुरक्षित केले

▶️ 
दिपक सदाफळे (जिव-रक्षक) पिंजर जिल्हा अकोला  यांची जिगरबाजी नगरपरिषद येथील तीस-या माळयावर चढुण केले रेस्क्यु ऑपरेशन.तसेच तिरुपती सीटीतील चक्क दोन झाडावरील चार आगेमोह काढले 
▶️ अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे  (जिवरक्षक) आणी त्यांचे सहकारी मयूर सळेदार,सतिश ठाकुर, ऋषीकेश राखोंडे यांनी मोठे धाडस करुन वाशिम शहरातील तिरुपती सीटीतील व नगरपरिषद मधिल सहा आगेमोह काढुन पुर्णपणे परीसर सुरक्षित केले यामुळे रहीवाशींसह ये-जा करणा-यांनी सुटकेचा श्वास सोडला
▶️ वाशिम शहरातील तीरुपती सीटीतील मध्यभागी असलेल्या   आवारातील दोन झाडावर  लागलेल्या चार आगेमोह एक दीड महिन्यापासुन लागले होते.तेव्हा पासुन या आगेमोहावरील मधमाशांनी ये-जा करणा-यांवर दोनतीन वेळा हल्ला चढविला होता तसेच नगरपरिषद च्या मेनगेटवर आणी याच ठिकाणी तीस-या मजल्यावर एक आगेमोह बसलेले होते.यामुळे पुढील एखादी मोठी दुर्घटना होऊनये म्हणून याची दखल घेऊन वाशिम  न.ग.प.चे सिईओ साहेब यांनी अग्निशमन विभाग प्रमुख गजानन गोरे साहेबांना सर्व ठीकाणचे आगेमोह काढण्यासाठी आदेश दीले होते.तेव्हा अ.वा.अ. गजानन गोरे साहेब यांनी अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ रेस्क्यु ऑपरेशन करण्यासाठी पाचारण केले.लगेच 28 मार्च रोजी सायंकाळी अ.वि.अ. गजानन गोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  (जिव-रक्षक) दिपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी सतीश ठाकुर,मयुर सळेदार, ऋषीकेश राखोंडे यांनी रेस्क्यु साहीत्यासह घटनास्थळी येऊन सुरक्षितपणे सहाही ठीकाणचे आगेमोह काढुन टाकले यामुळे तीरुपती सीटीसह नगरपरिषद येथे  येणा-यांना भयमुक्त केले यावेळी अ.वि.अ.गजानन गोरे साहेब यांच्या नेतृत्वात  अ.वि.क.दिनकर सुरोशे, गजानन सुर्वे,करण जाधव, तबरेज शेख,यांनी सहकार्य केले.अशी माहिती  दिपक सदाफळे यांनी दीली आहे.

Post a Comment

0 Comments