Ticker

6/recent/ticker-posts

य. च. कला व विज्ञान महाविद्यालयात पोस्टर प्रेझेंटेशन संपन्न-

मंगरूळपीर-मो. ठा . शि. प्र.मंडळ, कासोळा द्वारा संचालित यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालयात कला विभागाद्वारे पोस्टर प्रेझेंटेशन चे आयोजन 
दिनांक 16 एप्रिल 2022 शनिवार रोजी करण्यात आले. या उपक्रमांमध्ये कला विभागाचे सर्व विषयांचे प्राध्यापकांचा समावेश होता. या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ. कान्हेरकर  सर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले .यावेळी डॉ. कान्हेरकर   यांनी अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांबद्दल जनजागृती निर्माण होते असे प्रतिपादन केले.
या पोस्टर प्रेझेंटेशन मध्ये  गृह अर्थशास्त्र अभ्यास  मंडळाच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यात विविध विषयांवर जसे लसीकरण, स्त्रीभ्रूणहत्या, भाषाविकास, भावनिक विकास , शिस्तीचे महत्व,आहारात फळे व भाज्यांचे महत्त्व, कॅल्शियम ,लोह , आयोडीन, समतोल आहार, अन्नभेसळ इ. विविध विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले.
या उपक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे पोस्टर प्रेझेंटेशन केले .या उपक्रमांमध्ये प्रा. डॉ. वाघोळे, डॉ. देवके, डॉ.भगत, डॉ.पवार ,डॉ. ताकतोडे, डॉ.खान ,प्रा.पडवाल, प्रा. रमिज, प्रा. जाजू उपस्थितीत होते.संस्थेचे सचिव श्री. चंद्रकांत दादा ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कला विभागाचे पोस्टर प्रेसेंटेशन राबविण्यात आले. या उपक्रमामध्ये बी.ए .भाग 3 चे  दीक्षा शृंगारे ,स्नेहल वाडेकर , सोनल साखरकर ,प्रियंका ठाकरे ,निकिता म्‍हात्रे ,जयश्री शिखरे, आचलं इंगळे, पूजा शृंगारे, भाग्यश्री राऊत तर बी.ए. भाग 2 चे वैष्णवी घोडे, मयुरी कांबळे, गायत्री कोंडे, वैष्णवी अंभोरे, मोहना पंडित ,रेणु गोरटे,प्रेरणा अगमे,ज्ञानेश्वर डुकरे, शीतल सूर्वे इत्यादी विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदविला .डॉ.शिंदे, डॉ.जाधव ,डॉ. वानखेडे, डॉ. खंडारे यांनी  परीक्षक म्हणून कार्य केले .या उपक्रमा चे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व उपक्रम यशस्वी संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments